तरुण भारत

चिनी भिकाऱयांकडे आता ई-वॉलेट

रोख रकमेची मागणी केली बंद

एकीकडे चीन स्वतःच्या देशातील गरीबी पूर्णपणे संपुष्टात आल्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे त्याचे भिकारीही अधिक आधुनिक होत चालले आहेत. ते ई-वॉलेटद्वारे भीक मागून दर महिन्याला हजारो रुपये कमावत आहेत. चीनमध्ये तंत्रज्ञान अत्यंत विकसित असल्याने लोक रोख रकमेऐवजी डिजिटल कार्डचा सर्रास वापर करतात. अशा स्थितीत भिकाऱयांना लोकांकडून पैसे मागता येत नव्हते. हेच पाहून त्यांनी भिक मागण्याची पद्धत बदलून स्वतःला डिजिटल केले आहे.

Advertisements

चिनी भिकारी स्वतःसोबत ई-पेमेंटची सुविधा बाळगतात, जेणेकरून कुणी सुट्टे पैसे नसल्याचे निमित्त करू नये. तेथील भिकारी क्यूआर कोडसह एक पेपर बाळगतात आणि शहरातील पर्यटनस्थळे किंवा शॉपिंग मॉल यासारख्या ठिकाणी उभे राहतात. अशा ठिकाणी मोठय़ा संख्येत पर्यटक तसेच स्थानिक लोकाही येत असतात.

ई-वॉलेट कंपन्यांची मदत

चीनच्या दोन सर्वात मोठय़ा ई-वॉलेट कंपन्या याप्रकरणी भिकाऱयांना मदत करत आहे. एलिपे आणि व्हीचॅट वॉलेटने भिकाऱयांना तांत्रिक मदत पुरविली आहे. भिकाऱयाने क्यूआर कोडच्या मदतीने पैसे प्राप्त केल्यावर दानकर्त्याचा डाटा कंपन्यांना प्राप्त होतो, या कंपन्या मग या डाटाचा वापर स्वतःच्या जाहिराती किंवा अशाच कुठल्याच कामासाठी करतात.

क्यूआर कोडद्वारेच खरेदी

चीनच्या भिकाऱयांना ई-वॉलेट हाताळण्यासाठी मोबाईल बाळगण्याचीही गरज नाही. लोकांकडून मिळालेले पैसे थेट त्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा होता. याच क्यूआर कोडसह भिकारी दुकानांमध्ये जाऊन खरेदी करत आहेत.

Related Stories

ट्रम्प यांच्यावर बायडन संतापले

Patil_p

नियम अधिक कठोर

Patil_p

नासाच्या दोन अंतराळवीरांसह ‘Space X’ रॉकेटचे अवकाशात यशस्वी उड्डाण

datta jadhav

‘या’ देशात बलात्काऱ्यांना करणार नपुंसक

datta jadhav

पाकिस्तानचा जलद गोलंदाज हारिस रऊफ चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

मुदतीपूर्वीच लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!