तरुण भारत

मुंबई स्फोटांवर येतेय वेब सीरिज

काठमांडू कनेक्शन

23 एप्रिल रोजी डिजिटल प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर सस्पेन्स-थ्रिलर वेबसीरिज ‘काठमांडू कनेक्शन’ प्रदर्शित होत आहे. या वेबसीरिजची कथा 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांवर आधारित आहे. वेबसीरिजमध्ये अमित सियाल आणि गोपाळ दत्त मुख्य भूमिकेत आहेत. अमित सियाल डीसीपीच्या व्यक्तिरेखेत तर गोपाळ दत्त सीबीआय अधिकाऱयाच्या स्वरुपात दिसून येणार आहेत. सचिन पाठक यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

Advertisements

स्वतःच्या कामाबद्दल अत्यंत प्रामाणिक असलेल्या पोलीस अधिकाऱयाची भूमिका मी साकारत आहे. एका खटल्याच्या तपासाचे कनेक्शन काठमांडूपर्यंत पोहोचत असल्याचे यात दाखविण्यात आल्याची माहिती सियाल यांनी दिली आहे. ही वेबसीरिज काल्पनिक कथेवर आधारित असली तरीही अत्यंत वस्तुस्थितीदर्शक पद्धतीने त्याचे चित्रण करण्यात आले आहे. यात रोमान्स, नाटय़, सस्पेन्स आणि थ्रिलर देखील असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Related Stories

भाजप आता बंगालसाठी आखतोय रणनीती

datta jadhav

राज्यपाल धनखड यांना भेटले सौरव गांगुली

Patil_p

धोका वाढला : दिल्लीत गेल्या 24 तासात 1 हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण

pradnya p

उत्तराखंडात कोरोनाबाधितांची संख्या 96,625 वर

pradnya p

गुजरात दंगलीतील 17 आरोपींना जामीन

prashant_c

मध्यप्रदेश : विधानसभेतील 61 कर्मचारी आणि 5 आमदारांना कोरोनाची लागण

pradnya p
error: Content is protected !!