तरुण भारत

5 वर्षांची चिमुरडी, 105 मिनिटात वाचली 36 पुस्तके

जगभरात अशा अनेक प्रतिभा आहेत, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर प्रत्येकजण दंग होतो. अशी अनेक मुले असतात, जी कमी वयातच नृत्य, गायन, क्रीडाप्रकार, शिक्षण किंवा अन्य कार्यांमध्ये पारंगत असतात. अशीच एक मुलगी आहे कियारा कौर. ती केवळ 5 वर्षांची असली तरीही तिच्या नावावर दोन विश्वविक्रम आहेत.

कियारा कौर भारतीय-अमेरिकन आहे. ती संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) राहते. 105 मिनिटांमध्ये ती सलग 36 पुस्तके वाचू शकते. तिच्या नावावर लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये विक्रम नोंद आहेत.

Advertisements

लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्सने कियारा कौरला ‘वंडर चाइल्ड’ नाव दिल आहे. तिने 13 फेब्रुवारी रोजी एका मागोमाग एक सलग 105 मिनिटांपर्यंत 36 पुस्तके वाचून काढली आहेत. तेव्हा तिचे वय केवळ 4 वर्षे होते. सलग सर्वाधिक पुस्तके वाचणारी ती मुलगी असल्याचे एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्सने म्हटले आहे.

कियाराला पुस्तकांच्या वाचनाची आवड आहे. अबू धाबीत नर्सरी क्लासमध्ये असताना एका शिक्षकाने तिची ही प्रतिभा ओळखली होती. त्यानंतर लॉकडाउन लागू झाल्याने शाळा बंद झाली. कियाराने मागील एक वर्षात सुमारे 200 पुस्तके वाचली आहेत. कियाराचे आईवडिल मूळचे चेन्नईतील आहेत. कियाराचा जन्म अमेरिकेत झाला होता. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न आहे.

Related Stories

…तोपर्यंत कोरोना विषाणू फैलावत राहणार!

Patil_p

इराकमधील अमेरिकन दुतावास टार्गेट

Patil_p

लिबियात बोट उलटली; 74 जण बुडाले

datta jadhav

स्पेनमध्ये निदर्शने

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या पावणेदोन लाखांनजीक

datta jadhav

जर्मनीत लॉकडाऊन; 5 दिवस कठोर निर्बंध

datta jadhav
error: Content is protected !!