तरुण भारत

‘रेमडेसिवीर’च्या निर्यातीवर बंदी

तुटवडा भासत असल्याने केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचा पार्श्वभूमीवर भारत सरकारने हे इंजेक्शन व त्यासाठी लागणाऱया कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. हा निर्णय देशातील कोरोना परिस्थिती आटोक्मयात येईपर्यंत लागू असल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या विविध इस्पितळांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

कोरोना विषाणूग्रस्त गंभीर रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने आता केंद्र सरकारने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे आता रेमडेसिवीर इंजेक्शन व ते बनवण्यासाठी लागणारी सामग्री देशाबाहेर निर्यात करता येणार नाही.

Related Stories

महाराष्ट्रात मुंबईपाठोपाठ नाशिकमध्येही भूकंपाचे धक्के

pradnya p

ममता बॅनर्जींनी घेतली तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

datta jadhav

महाराष्ट्रात तूर्तास करवाढ नाही : बाळासाहेब थोरात

datta jadhav

कोविड-19 संसर्गाच्या संकटात ‘डिजिटल योग’

Patil_p

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 16,594

pradnya p

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 70 लाखांचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!