तरुण भारत

‘लस उत्सव’ हे कोरोना विरोधात दुसरे ‘युद्ध’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, 14 पर्यंत चालणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

कोरोना उद्रेकाला रोखण्यासाठी 11 एप्रिलपासून देशव्यापी ‘लस उत्सवा’चा प्रारंभ झाला आहे. तो 14 एप्रिल पर्यंत चालणार आहे. हे कोरोना विषाणूविरोधात दुसरे युद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. या चार दिवसांच्या काळात जास्तीत जास्त लोकांना लस दिली जाणार आहे.

या लस उत्सवाच्या प्रारंभानिमित्त त्यांनी एक सविस्तर संदेश प्रसारित केला आहे. प्रत्येक सुजाण आणि सुशिक्षित व्यक्तीने किमान एका अशिक्षित किंवा वयोवृद्ध व्यक्तीला लस घेण्यास साहाय्य करावे (ईच वन, व्हॅक्सिनेट वन) आणि प्रत्येक सुदृढ व्यक्तीने एका रूग्णाला उपचारात साहाय्य करावे (ईच वन ट्रीट वन) अशी दोन महत्वाची आवाहने त्यांनी आपल्या संदेशात केली आहेत. त्याच प्रमाणे प्रत्येकाने एका रूग्णाला वाचविण्याचा प्रयत्न करावा (ईच वन, सेव्ह वन) अशीही कळकळीची सूचना त्यांनी आपल्या संदेशात देशवासियांना केली आहे.

चाचण्यांवर भर हवा

आपल्या आसपास एक जरी कोरोना रूग्ण आढळला तरी त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घेणे आवश्यक आहे. असे केल्यासच या रोगाच्या प्रसाराची साखळी तुटणार आहे. हा रोग झपाटय़ाने पसरणारा असल्याने प्रत्येकाने जास्तीत जास्त दक्षता घ्यावी. मास्कचा उपयोग आणि शारिरीक अंतर या नियमांचे पालन कसोशीने केले जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यश जागरूकतेवर अवलंबून

कोरोना विरोधातील युद्धात आपले यश आपल्या जागरूकतेवर अवलंबून आहे. आपण जितके जास्त जागरूक असू, तितक्या अधिक प्रमाणात करोना नियंत्रणात येईल. चाचणी, रूग्णशोध, उपचार आणि लसीकरण हे चार महत्वाचे मुद्दे आहेत. त्यांच्यावर भर देणे आवश्यक ठरणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

लसीकरण अत्यावश्यक

प्रत्येक पात्र व्यक्तीने लस घेणे आवश्यक आहे. भारतात दिल्या जाणाऱया दोन्ही लसी अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहेत. त्याच्या परिणामकारकतेसंबंधात कोणतीही शंका घेऊ नये. सध्या कोरोनावर हा एकमेव उपाय असल्याने प्रत्येकाने कोणतीही शंका न बाळगता लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Related Stories

भारत बायोटेकचा लसवापरासाठी अर्ज

Patil_p

भारत-चीन तणावावर आज मेजर जनरल स्तरावर बैठक

datta jadhav

मध्यप्रदेशात 54 प्रवाशी असलेली बस कालव्यात कोसळली…

datta jadhav

उत्तराखंडात मागील 24 तासात 2402 नवे कोरोना रुग्ण

pradnya p

पाकिस्तान अन् तुर्कस्तानला चांगलेच सुनावले

Amit Kulkarni

देशात मागील 24 तासात निच्चांकी रुग्णवाढ

datta jadhav
error: Content is protected !!