तरुण भारत

पाकची टी-20 मालिकेत विजयी सलामी

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

सलामीचा फलंदाज मोहम्मद रिझवानच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर शनिवारी येथे पाकिस्तानने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 4 गडय़ांनी पराभव करत चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी सलामी दिली.

Advertisements

या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 188 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर पाकने 19.5 षटकांत 6 बाद 189 धावा जमवित हा सामना केवळ एक चेंडू बाकी ठेवून 4 गडय़ांनी जिंकला. ‘सामनावीर’ मोहम्मद रिझवाने 50 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 74 धावा झळकविल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर गेलेल्या पाक क्रिकेट संघाने यापूर्वी वनडे मालिका जिंकली आहे. शनिवारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावात कर्णधार क्लासेनने 28 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 50, मार्करमने 32 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 51, मलानने 16 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 24, बिलीजोनने 24 चेंडूत 2 षटकारांसह 34 धावा जमविल्या. लिन्डे 6 तर लुबे 4 धावांवर बाद झाले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 10 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे मोहम्मद रिझवान आणि हसन अली यांनी प्रत्येकी 2 तर शाहीन आफ्रिदी आणि रौफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावात मोहम्मद रिझवानने नाबाद 74 धावा जमवित आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला. कर्णधार बाबर आझमने 3 चौकारांसह 14, फक्र झमानने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 19 चेंडूत 27, हाफीजने 1 चौकारांसह 13, हैदर अलीने 3 चौकारांसह 14, अश्रफने 14 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 30, हसन अलीने 3 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 9 धावा जमविल्या. पाकच्या डावात 4 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे हेंड्रिक्सने 32 धावांत 3, शम्सीने 29 धावांत 2 तर विलीयम्सने 39 धावांत 1 गडी बाद केला. आता या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्गमध्ये सोमवारी खेळविला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 6 बाद 188 (मार्करम 51, क्लासेन 50, बिलीजोन 34, मलान 24, नवाज 2-21, हसन अली 2-28, रौफ 1-37, शाहीन आफ्रिदी 1-45) पाक 19.5 षटकांत 6 बाद 189 (मोहम्मद रिझवान नाबाद 74, अश्रफ 30, झमान 27, बाबर आझम 14, हाफीज 13, हैदर अली 14, हेंड्रिक्स 3-32, शम्सी 2-29, विलीयम्स 1-39).

Related Stories

ऑस्ट्रेलियात जोकोविच आठव्यांदा अजिंक्य

Patil_p

सिरिएलोकडून विश्लेषण प्रशिक्षकपदाचा त्याग

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया दौरा कार्यक्रम निश्चित

Omkar B

पंजाबविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ‘किंग’

Patil_p

पुढील वर्षी भारताचा इंग्लंड दौरा

Omkar B

कोव्हिडच्या अस्मानी संकटात विंडीज संघ इंग्लंडमध्ये दाखल

Patil_p
error: Content is protected !!