तरुण भारत

पीसीबीच्या हॉल ऑफ फेमचे उद्घाटन लवकरच

वृत्तसंस्था/ कराची

पाकच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱया क्रिकेटपटूंचा गौरव करण्याचा निर्णय पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबी) घेतला आहे. या माजी क्रिकेटपटूंचा आदर्श नवोदित क्रिकेटपटूंसमोर कायमचा रहावा यासाठी पीसीबीने हॉल ऑफ फेमची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसामध्ये पीसीबीच्या हॉल  ऑफ फेमचे उद्घाटन होणार आहे.

Advertisements

पीसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये पाकच्या माजी सहा क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात येणार आहे. माजी क्रिकेटपटू हनिफ मोहम्मद, इम्रान खान, जावेद मियाँदाद, वासिम अक्रम, वकार युनूस आणि झहीर अब्बास यांचा पीसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणार असल्याची माहिती पीसीबीच्या प्रवक्त्याने दिली आहे. पीसीबीच्या या नव्या हॉल ऑफ फेममध्ये 2021 पासून प्रत्येकवर्षी तीन सदस्यांचा समावेश करण्यात येईल. 1952 साली पाकने कसोटी क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले होते.

Related Stories

बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकला कोरोनाची बाधा

Patil_p

रोनाल्ड कोमन बार्सिलोनाचे नवे प्रशिक्षक

Patil_p

मनु भाकर राष्ट्रीय नेमबाज विजेती

Patil_p

आरसीबीने जिंकला ‘लो स्कोअरिंग थ्रिलर’!

Patil_p

ट्रिनबॅगो नाईट रायडर्सचा सलग नववा विजय

Patil_p

राष्ट्रीय सबज्युनियर मिनी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ अंतिम फेरीत

prashant_c
error: Content is protected !!