तरुण भारत

दक्षिण आफ्रिका संघाला दंड

वृत्तसंस्था/ दुबई

जोहान्सबर्गमध्ये झालेल्या पाकविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने षटकांची गती न राखल्याबद्दल संघाला 20 टक्के रकमेचा दंड करण्यात आला आहे.

Advertisements

आयसीसीने दिलेल्या निवेदनानुसार, या सामन्यात हेन्रीच क्लासेनच्या नेतृत्वाखाली द.आफ्रिका संघाने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्यामुळे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई केली आहे. नियमानुसार निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्यास संघातील प्रत्येक खेळाडूला सामना मानधनातील 20 टक्के रकमेचा दंड करण्यात येतो. कर्णधार क्लासेनने अपराध व दंड मान्य केल्याने औपचारिक सुनावणी घेण्यात आली नाही. मैदानी पंच ऍड्रियन होल्डस्टॉक, अल्लाहुदीन पालेकर, तिसरे पंच बांगनी जेले, चौथे पंच शॉन जॉर्ज यांनी हा आरोप केला होता.

Related Stories

महिलांचे प्ले ऑफ फुटबॉल सामने लांबणीवर

Patil_p

आनंदचा सलग पाचवा पराभव

Patil_p

लॉकडाऊनमध्ये सराव, रोनाल्डोला समज

Patil_p

अमेरिकेचे सुवर्णपदक विजेते ऍथलीट रेफर जॉन्सन कालवश

Patil_p

ऑस्ट्रियातील शर्यतीने फॉर्म्युला वन मोसमाची सुरुवात

Patil_p

हरमनप्रीत कौर कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!