तरुण भारत

आयपीएलमधील युवा यष्टीरक्षकांसाठी धोनी प्रेरणास्थान

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग मानल्या जाणाऱया आयपीएलमध्ये बरेच युवा, उमदे यष्टीरक्षक उदयास येताना दिसून येत आहेत, यामागे धोनीच मुख्य प्रेरणास्थान आहे, असे प्रशंसोद्गार राजस्थान रॉयल्सचा इंग्लिशमन यष्टीरक्षक जोस बटलरने काढले. सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत 8 प्रँचायझीपैकी 4 संघाचे कर्णधार हे यष्टीरक्षकच आहेत. याचे श्रेय देखील धोनीलाच जाते.

Advertisements

महेंद्रसिंग धोनी 2008 मधील उद्घाटनाच्या स्पर्धेपासून चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या यष्टीरक्षण व नेतृत्वाची धुरा सांभाळत आला आहे. याशिवाय, या हंगामात केएल राहुल (पंजाब किंग्स), संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) व रिषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स) हे यष्टीरक्षक-फलंदाज देखील त्यांच्या संघांचे नेतृत्व भूषवत आहेत.

‘धोनीचा सिक्स्थ सेन्स अतिशय तीक्ष्ण स्वरुपाचा आहे. तो कर्णधार म्हणून उत्तम आहेच. शिवाय, यष्टीरक्षणात त्याचा हात धरणारा दुसरा खेळाडू दृष्टिक्षेपात नाही. साहजिकच, युवा खेळाडूंचा तो प्रेरणास्थान ठरत असेल तर त्यात आश्चर्याचे कारण नाही. तसे पाहता, खेळपट्टीचा स्वभाव कसा आहे, हे सर्वप्रथम यष्टीरक्षकच ताडतो आणि त्या दृष्टीने बदल करणे उपयुक्त ठरते. गोलंदाजांना कसा मारा करणे योग्य ठरेल, याची सूचनाही यष्टीरक्षकच करु शकतो’, असे बटलर स्पष्टीकरणार्थ म्हणाला.

30 वर्षीय इंग्लिशमन जोस बटलरने संजू सॅमसन कर्णधार या नात्याने उत्तम योगदान देऊ शकतो, असे येथे नमूद केले. शिवाय, बेन स्टोक्स हा राजस्थान रॉयल्ससाठी एक्स फॅक्टर ठरेल, याचाही उल्लेख केला. इंग्लंडतर्फे बटलरने 50 कसोटी, 148 वनडे व 79 टी-20 सामने खेळले आहेत. अलीकडेच भारताविरुद्ध संपन्न झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने मॉर्गनच्या गैरहजेरीत संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. प्रेक्षकांशिवाय स्टेडियममध्ये खेळणे आणि सातत्याने बायो-बबलच्या कडक बंधनात राहणे कष्टप्रद असल्याचेही त्याने येथे सांगितले.

यंदाच्या आयपीएल संघातील मुख्य यष्टीरक्षक

प्रँचायझी / यष्टीरक्षक / देश

मुंबई इंडियन्स / इशान किशन / भारत

चेन्नई सुपरकिंग्स / महेंद्रसिंग धोनी / भारत

दिल्ली कॅपिटल्स / रिषभ पंत / भारत

केकेआर / दिनेश कार्तिक / भारत

सनरायजर्स हैदराबाद /वृद्धिमान साहा / भारत

पंजाब किंग्स / केएल राहुल / भारत

आरसीबी / एबी डीव्हिलियर्स / द. आफ्रिका

राजस्थान रॉयल्स / जोस बटलर / इंग्लंड

Related Stories

चेन्नईचे फलंदाज सरकारी नोकरांसारखे वागताहेत!

Patil_p

NZvsIND : भारतीय संघावर व्हाईटवॉशची नामुष्की

tarunbharat

ऑस्ट्रेलियाच्या विजयात ऍगरची विक्रमी गोलंदाजी

Patil_p

इंग्लंड दौऱयावर जाण्यास तीन विंडीज खेळाडूंचा नकार

Patil_p

जॉर्डनच्या मुष्टीयोद्धय़ाचे निधन

Amit Kulkarni

ला लिगामध्ये रियल माद्रिदचे 34 वे विजेतेपद

Patil_p
error: Content is protected !!