तरुण भारत

केकेआरचा हैदराबादविरुद्ध सफाईदार विजय

सामनावीर नितीश राणा, राहुल त्रिपाठी यांची जोरदार अर्धशतके, सनरायजर्स हैदराबादवर 10 धावांनी विजय

चेन्नई / वृत्तसंस्था

Advertisements

सामनावीर नितीश राणा (56 चेंडूत 80), राहुल त्रिपाठी (29 चेंडूत 53) यांची आक्रमक अर्धशतके व प्रसिद्ध कृष्णा, आंद्रे रसेलच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादला 10 धावांनी पराभूत केले. वानखेडे स्टेडियमवरील या लढतीत प्रारंभी केकेआरने 6 बाद 187 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात हैदराबादला 5 बाद 177 धावांवर समाधान मानावे लागले.

विजयासाठी 187 धावांचे आव्हान असताना मनीष पांडे (44 चेंडूत नाबाद 61) व जॉनी बेअरस्टो (40 चेंडूत 55) यांनी आक्रमक फटकेबाजी केली. पण,  निर्णायक टप्प्यात केकेआरच्या गोलंदाजांनी भेदक मारा साकारत हैदराबादला विजयापासून रोखले. आंद्रे रसेलच्या डावातील शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 22 धावांची गरज होती. पण, ते यात सपशेल अपयशी ठरले.

कर्णधार डेव्हिड वॉर्नर (3) व वृद्धिमान साहा (7) लवकर बाद झाल्यानंतर हैदराबादला मोठे धक्के बसले आणि यातून ते अनेक प्रयत्नानंतरही फारसे सावरु शकले नाहीत. वॉर्नरला हरभजनच्या पहिल्याच षटकात कमिन्सकडून जीवदान मिळाले होते. पण, याचा त्याला अजिबात लाभ घेता आला नव्हता.

सनरायजर्स हैदराबाद ः वृद्धिमान साहा त्रि. गो. शकीब हसन 7 (6 चेंडूत 1 षटकार), डेव्हिड वॉर्नर झे. कार्तिक, गो. प्रसिद्ध कृष्णा 3 (4 चेंडू), मनीष पांडे नाबाद 61 (44 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), जॉनी बेअरस्टो झे. राणा, गो. कमिन्स 55 (40 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), मोहम्मद नबी झे. मॉर्गन, गो. प्रसिद्ध कृष्णा 14 (11 चेंडूत 2 चौकार), विजय शंकर झे. मॉर्गन, गो. रसेल 11 (7 चेंडूत 1 षटकार), अब्दुल समद नाबाद 19 (8 चेंडूत 2 षटकार). अवांतर 7. एकूण 20 षटकात 5 बाद 177.

गडी बाद होण्याचा क्रम

1-10 (वॉर्नर, 1.3), 2-10 (साहा, 2.1), 3-102 (बेअरस्टो, 12.6), 4-131 (नबी, 15.6), 5-150 (विजय शंकर, 17.6).

गोलंदाजी

हरभजन 1-0-8-0, प्रसिद्ध कृष्णा 4-0-35-2, शकीब हसन 4-0-34-1, पॅट कमिन्स 4-0-30-1, आंद्रे रसेल 3-0-32-1, वरुण चक्रवर्ती 4-0-36-0.

Related Stories

अवघ्या चेन्नई संघावर मुंबईचे सलामीवीर भारी!

Patil_p

आयपीएल स्पर्धेवेळी प्रत्येक पाच दिवसांनी खेळाडूंची कोरोना चांचणी

Patil_p

विश्वचषक स्पर्धेत प्रसिद्ध कृष्णा ‘सरप्राईज पॅकेज’ ठरेल

Patil_p

पाकमधील सामन्यासाठी पंचांची नियुक्ती

Patil_p

सचिन, वॉल्श यांचे मार्गदर्शन

Patil_p

चीनमधील सहा फुटबॉलपटूंवर बंदी

Patil_p
error: Content is protected !!