तरुण भारत

साताऱयात रुग्णांना मिळेनात बेड

होम आयसोलेशनवर वाढला भार

विशाल कदम/ सातारा

Advertisements

दररोज आठशेहून अधिक रुग्ण बाधित आढळून येत आहेत. बाधित येणाऱया रुग्णांवर उपचार करण्यासाठी नातेवाईक बेडची शोधाशोध करत आहेत. मात्र, जिह्यात बेडच शिल्लक नाहीत, अशी अवस्था झाली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये हे प्रयत्न करत आहेत. नव्याने चार ठिकाणी बेड वाढवण्याचा प्रस्ताव त्यांनी शासनाला पाठवला आहे. त्यामुळे बेडची समस्या काही दिवसांत सुटणार आहे. होम आयसोलेशनवर जास्त भर दिला जात आहे.

कोरोनाची दुसरी लाट सध्या जिह्यात खैंदूळ माजवत आहे. सातारा, कराड या दोन्ही तालुक्यांबरोबरच इतर तालुक्यामध्ये  बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोना बाधित होणाऱयांचा प्रमाण जास्त असल्याने त्यांना उपचार देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आपल्या रुग्णास बेड मिळावा यासाठी नातेवाईक प्रयत्न करत आहेत. बेड कुठे मिळेल काय यासाठी नातेवाईकाकडून खाजगी हॉस्पिट व क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाकडे पाठपुरावा करतात. त्यातच टोल फ्री नंबर 1077 हा बंदच आहे. त्यामुळे नेमके नातेवाईकांनी विचारयचे तरी कोणाला असा प्रश्न नातेवाईकांना पडतो. सातारा जिह्यात कोरोनाची दाहकता वाढत चालली आहे. त्याच प्रमाणात बेड मात्र उपलब्ध नाहीत. प्रशासनाकडून त्याकरता नेमके काय करता येईल यासाठी दररोज अभ्यासपर बैठकांचे सत्र सुरु आहे.

या बेडच्या समस्येबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपल्या जिह्यात आयसीयु बेडची कमतरता आहे. आयसीयुमध्ये 193 विथ एनटी बेड आहेत. तर विदाऊट एनटी बेड 300 आहेत. बाकी ऑक्सीजनचे बोड 1796 आहेत. बेडची कमरता भरुन काढण्यासाठी आणि कोरोना बाधित रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होण्यासाठी 4 ठिकाणी बेड वाढवण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये क्रांतसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 15 बेड, जंबो हॉस्पिटलमध्ये 20 बेड, काशिळ येथील नव्याने होणाऱया कोरोना केअर सेंटरमध्ये 30 बेड आणि बॅडमिंटन कोर्टमध्ये 78 बेड सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

सातारा : सह्याद्रीची जैवविविधता समृद्ध

datta jadhav

ऊस तोडणी मजूर जाणार आपल्या गाव

Shankar_P

अजिंक्यताऱ्याच्या साक्षीने रेकॉर्ड अजिंक्य डॉ. संदीप काटे यांनी संकल्प केला पुर्ण

triratna

हद्दवाढ विकासासाठी लवकरच निधी

Patil_p

भाजपतर्फे मोफत घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती शिबीर

triratna

सातारा : काळोशी गावचे सुपुत्र जवान सुरज लामजे यांचे अपघाती निधन

triratna
error: Content is protected !!