तरुण भारत

राजेंची जावलीत ढिश्युम ढिश्युम

विकेंड लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशी राज्य सरकारवर केला राग व्यक्त

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

खासदार उदयनराजेंच्याच संवादात एक बार मैने कमिटमेंट की तो खुद की नही सुनता या प्रमाणे लॉकडाऊनच्या विरोधात जनेतच्या हिताकरता एकदा ठरवल की ठरवल म्हणत विकेंडच्या पहिल्याच दिवशी त्यांनी हाती कटोरा घेवून राज्य सरकारच्या निषेधार्थ भिक मांगो आंदोलन केले. दुसऱया दिवशी रविवारी लॉकडाऊन केल्याचा राग त्यांनी जावलीत जावून बॉक्सिंग किटवर काढला. तब्बल चौदा किलोचा करेल उचलून युवकांनीच नव्हे तर सर्वांनी व्यायाम करणे महत्वाचे आहे असा संदेश दिला. मात्र कालच्या भिक मागो आंदोलनावर खासदार उदयनराजे भोसले एकटेच असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार नसल्याचे मिडीयाला पोलीस अधिक्षकांनी सांगितले.

खासदार उदयनराजेंची स्टाईल हटके, त्यांची चाल हटके, त्यांचे कार्यकर्ते पण हटकेच. कोणी त्यांना प्रेमाने मालक म्हणतात तर कोणी बच्चन. कधी खुर्चीत खुर्ची घालून सगळे पक्ष आपल्याच खिशात असाही त्यांनी संदेश देत त्या खुर्चीवर बसतात. तर कधी कोणाला जादूची झप्पी घेवून झटका देतात. कधी रानात काम करणाऱया शेतकऱयांशी हितगुज साधतात. त्यांच्या चप्पलांचा आवाज, त्यांचा वेश एवढ नाही तर त्यांचे डायलॉगही हटके असतात. सध्या विकेंड लॉकडाऊन सुरु आहे. त्याच लॉकडाऊनमध्ये अनेकांचे हाल होत आहेत. अनेकजण भुकेने तडफडत आहेत. अनेकांची कर्जे थकली आहेत. त्यामुळे लॉकडाऊन नकोच अशी  लोकांच्या मागणीसाठी स्वतः उदयनराजेंनी शनिवारी भर दुपारी पोवई नाक्यावरील आंब्याखाली कटोरा घेवून पोत्यावर बसून सरकार विरोधात भिक मागो आंदोलन केले. जमा झालेली साडेचारशे रुपयांची भिक प्रशासनाला दिली. उद्यापासून लॉकडाऊन नाही पाहिजे म्हणत दिवस संपला.

दुसऱया दिवशी खासदार उदयनराजेंनी सकाळी उठल्यावर जावली गाठली. जावलीतील एका कार्यकर्त्यांच्या स्टे हाऊसवर भेट दिली. तेथे तो बॉक्सिंगचा सराव करत होता. खासदार उदयनराजेंनी लॉकडाऊन विरोधात बॉक्सिंग किटवर सराईत फाईटरसारख्या फाईटी ठेवून देवून राग व्यक्त केला. तसेच 14 किलोचा करेल फिरवून आजच्या पिढीने व्यायाम केला पाहिजे. स्वतःची शरीरयृष्टी जपली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. त्यांचा जावलीत ढिश्यूम ढिश्यूमचा व्हिडिओ चांगलाच गाजला.

Related Stories

भाटय़े समुद्रकिनारी पर्यटकांची स्कार्पिओ बुडता-बुडता वाचली

Amit Kulkarni

सातारा : जिल्हा हजाराच्या समीप, आज 36 बाधित तर 2 मुक्त

triratna

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा उडणार ‘धुरळा’

Patil_p

रंगभूमी दिन साजरा

Patil_p

सदर बाजार परिसरात पाण्याचा ठणाणा

Patil_p

अकरानंतर कराडात शुकशुकाट

Patil_p
error: Content is protected !!