तरुण भारत

कारवाईत 32 लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी/ फलटण

फलटण शहरातील कुरेशीनगर भागात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या जनावरांच्या कत्तलखान्यावर फलटण शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने छापा. टाकला. या घटनेत पोलिसानी 40 जनावरांसह  सुमारे 32 लाख 83 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पाचजणांवर जनावरांची अवैध वाहतूक व कत्तलीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना ताब्यात घेतले असून दोघे फरारी झाले आहेत.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आखरी रस्ता कुरेशी नगर फलटण येथे जाकीर कुरेशी यांच्या घरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत किंद्रे फलटण शहर पोलीस निरीक्षक, नवनाथ गायकवाड सपोनि, सचिन रावळ सपोनि, सहाय्यक पोलिस फौजदार शिंदे,  पोलिस हवालदार  शिंदे यांच्या पथकाने तिथे छापा टाकला.

 यावेळी तिथे वाजिद जाकीर कुरेशी, इलाही हुसेन कुरेशी, गौस रहीम कुरेशी, तोसिफ अनिस कुरेशी, अरबाज नियाज कुरेशी, (सर्व रा. मंगळवार पेठ फलटण) हे अवैधरित्या जनावरांची कत्तल करत असताना मिळून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस व पंच येण्याची चाहूल लागताच तोसिफ कुरेशी व अरबाज कुरेशी यांनी तेथून पळ काढला.

घटनासथळी तिथे 40 वासरे टेम्पोमध्ये भरलेल्या स्थितीत मिळून आली. मात्र पोलिसाच्या दक्षतेमुळे जनावरांना जीव दान मिळाले आहे. या कारवाईत  650 किलो जनावरांचे मास, 40 लहान जर्शी गाईची वासरे, टाटा कंपनीचा 407 टेम्पो (क्रमांक एम एच 20 एफ 6768), पांढरी रंगाची इनोवा कार (क्रमांक एम एच 01 व्ही 9860), इलेक्ट्रॉनिक वजन काटा, दोन मोबाईल हँडसेट असे एकूण 32 लाख 83 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Related Stories

जागतिक बुद्धिबळदिनानिमित्त सांगलीमधून विविध ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

triratna

जुंगटी ते कात्रेवाडी रस्ता होण्यासाठी युवकांनी गाठला

Omkar B

सातारा : डंपर खाली चिरडून महिला ठार

Shankar_P

लॉकडाऊनला विरोध : मार्केट 9 ते 7 सुरु ठेवण्याची मागणी

Patil_p

कोल्हापूर : कोरोना वॉर्डमध्ये दोघांचा मृत्यू

triratna

महाराष्ट्र : दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद घटली

pradnya p
error: Content is protected !!