तरुण भारत

जिल्हा प्रशासनाला अर्लट राहण्याच्या सूचना

पालकमंत्री ऍक्शन मोडवर ः केंद्रीय पथकाकडून आढावा

प्रतिनिधी/सातारा

Advertisements

जिल्हय़ात वाढत्या रुग्ण संख्येने केंद्रीय पथकाने जिल्हय़ाचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ऍक्शन मोडमध्ये येवून अधिकाऱयांची बैठक घेतली आणि प्रशासनाला अर्लट राहण्याच्या सूचना केल्या तर केंद्रीय पथकाने आढावा घेतल्यानंतर सातारा येथील जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये व्हेंटेलेटरची संख्या वाढवावी, ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. बेडच्या उपलब्धतेची माहिती जनतेला व्हावी यासाठी प्रत्येक कोविड हॉस्पीटलच्या बाहेर बेड उपलब्धतेची माहिती रोजच्या रोज अपडेट करावी, अशा सूचना केंद्रीय पथकातील डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन यांनी रविवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

केंद्रीय पथकाने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  जिह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. यावेळी  केंद्रीय पथकाने जिल्हा प्रशासनाला उपयुक्त अशा सूचना केल्या.

 सातारा येथील जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये व्हेंटेलेटरची संख्या वाढवावी तसेच जिह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बेडच्या उपलब्धतेची माहिती जनतेला व्हावी यासाठी प्रत्येक कोविड हॉस्पीटलच्या बाहेर बेड उपलब्धतेची माहिती रोजच्या रोज अपडेट करावी. जो भाग कटेन्मेंट जाहीर केला आहे अशा भागात केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रभावी अमंलबजावणी करावी. कोरोना संसर्ग रुग्णाच्या जे-जे संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांची तातडीने कोरोना टेस्टींग करावे, यासह विविध सुचना केंद्रीय पथकातील डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या.

जिह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधा वाढण्यावर भर देत असल्याचे या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

पालकमंत्री ऍक्शन मोडमध्ये

एप्रिलमध्ये पुन्हा गतवर्षीच्या सप्टेंबरची स्थिती उद्भभवू लागल्याने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी रविवारी जिल्हाधिकार शेखर सिंह यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकाऱयांची विश्रामगृहात बैठक घेवून आढावा घेतला. यावेळी जिह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाला अलर्ट करा, कोणतीही व्यक्ती औषोधोपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, त्यासाठी योग्य ते नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा झाला असून लसीकरणाची मोहिम गतीने राबवावी. तसेच रेमडीसीविर औषधाचा तुटवडा भासणार नाही याचेही नियोजन करावे. तसेच कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या पाहता कोरोना रुग्णालयामध्ये बेडची क्षमता वाढवावी. अशाही सूचना पाटील यांनी बैठकीत दिल्या.

Related Stories

पुणे : वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापौरांनी घेतला ‘हा’ निर्णय

pradnya p

साताऱ्यात महिलेचे मंगळसूत्र लांबवले

datta jadhav

सहकार भारतीचे उपक्रम सहकारी संस्थांसाठी उपयुक्त : अनंतराव जोशी

triratna

जिल्ह्यातील 46 जण पॉझिटिव्ह तर तीन बाधितांचा मृत्यू

triratna

पीएम किसन योजना पुसेगावला पोहचेना

Patil_p

ट्रकचालकास लुटणारे टोळके जेरबंद

Patil_p
error: Content is protected !!