तरुण भारत

कडशी मोपा येथे काजु बागायतीला आग लागुन पाच लाखांचे नुकसान

आग लावणाऱया विरुद्ध पेडणे पालीस स्टेशन मधे तक्रार दाखल                               

 मोरजी /प्रतिनिधी                     

Advertisements

कडशी मोपा येथील  प्रसाद कोरगावकर यांच्या काजु बागायतीला आग लागुन  प्रसाद यांच्या बागेतील सुमारे सहाशे काजु कलमे व ईतर झाडे  जळुन खाक झाल्याने  सुमारे  पाचलाख रुपयांचे नुकसान झाले .अनिरुद्ध गुरुदास विर्नोडकर याने आपल्या घराच्या साफ सफाई साठी ऐन दुपारी  साडेबारा ते एक च्या दरम्यान घातलेल्या  आगीचा भडका उठुन तो प्रसाद यांच्या काजु बागायतीत गेल्याने  ही आग लागली.  या बाबत सवीस्तर माहीती अशी की  आज दुपारी साडेबारा च्या दरम्यान अनिरुद्ध विर्नोडकर यानी आपल्या नवीन बांधलेल्या  घराच्या साफ सफाई साठी  अंगणाच्या बाहेर  गवताला आग लावली  होती  .त्यांचे घर उंच माळरानावर असल्याने व भर दुपारची वेळ असल्याने आगीचा त्वरीत वणवा उठला. व तो त्यांच्या घराच्या जवळच म्हणजेच सुमारे  पंधरा वीस मीटर अंतरावर  असलेल्या प्रसाद यांच्या काजु बागायतीत गेला.  प्रसाद यानी आपल्या काजु साफ करुन काजु बागायतीतील झुडपे कापुन काजुंच्या झाडाच्या बाजुला  ठेवली होती तर  आजु बाजुचे गवत  व पाचोळा  काजुच्या झाडाना थंडावा मीळावा म्हणुन झाडांच्या  मुळात जमा करुन ठेवला होता  त्याने पेट घेतल्याने काजुची सर्व झाडे मुळासकट जळुन गेली. घटनेची खबर पेडणे अग्नीशमन दलाला कळविताच त्यानी त्वरीत आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न केला  परंतु तोवर प्रसाद कोरगावकर यांच्या संपुर्ण बागायतीत आग पसरली होती .त्यांची संपुर्ण बागायतीतील सर्वच्या सर्व झाडे जळुन गेली . या आगीतुन ग्रामस्थ व अग्नीशमन दलाच्या प्रयत्ना मुळे बबन शेटय़? यांच्या सह राजाराम मावळंकर यांची मोठा काजु बागायतीचा डोंगर वाचवण्यात यश मीळाले  या डोगरावर मावळंकर यांची दहा हजाराहुन अधीक काजु झाडे आहेत त्याच प्रमाणे रुपेश रेडकर  यांचेही  नारळाची बाग घोडय़ांचा तबेला शेत मांगर वाचवणे शक्मय झाले  त्यात करोडो रुपयामचे नुकसान झाले असते.या बाबत  प्रसाद कोरगावकर यानी अनिरुद्ध विरनोडकर याच्या विरुद्ध बेपर्वाईने आग लाउन आपले नुकसान केल्या बद्दल पेडणे पेलीस स्टेशनमधे तक्रार  केली आहे  .

Related Stories

गोवाला नमवून मुंबई अंतिम फेरीत

Amit Kulkarni

आयसीएआर अधिकारी मदिना सोलापुरी विरोधात गुन्हा नोंद

Amit Kulkarni

विद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर

Patil_p

पेडणे तालुक्मयात दिवसभरात 33 नवीन कोरोना बाधित

Patil_p

मगरींचा लोकवस्तीपर्यंत संचार वाढला

Omkar B

दहा हजार परप्रांतीय मजूरांचा परतीचा मार्ग मोकळा

tarunbharat
error: Content is protected !!