तरुण भारत

हरिद्वार : कुंभमेळ्यात लाखो भक्तांची गर्दी; कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा

ऑनलाईन टीम / हरिद्वार : 


एकीकडे करोनाचा कहर वाढत असतानाच दुसरीकडे हरिद्वारमध्ये रविवारी कुंभमेळ्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी लोकांकडून कोरोनाच्या नियमांचे जाहीरपणे उल्लंघन करण्यात आले आहे. मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन यावेळी करण्यात आले नाही.

Advertisements


गंगा नदीत स्नान करण्यासाठी पवित्र दिवस मानल्या जाणाऱ्या शाही स्नानाच्या एक दिवस आधी लाखोंच्या संख्येने भक्तांनी नदी किनारी गर्दी केली. यावेळी नियमांची पायमल्ली करण्यात आली.

कुंमेळ्याचे आयजी संजय गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही लोकांना सतत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगत आहोत. मात्र, गर्दीच एवढी आहे की, व्यावहारिक दृष्ट्या पालन करणे अश्यक होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे पण या एवढ्या प्रचंड प्रमाणात असलेल्या गर्दीमुळे ते  आवाक्याबाहेर जात आहे. आम्ही असे करण्याचा प्रयत्न केला तर चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून आम्ही तसे करत नाही आहोत. 


पुढे ते म्हणाले, सकाळी 7 वाजेपर्यंत भक्तांना स्नान करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर ही जागा आखड्यासाठी राखीव ठेवली जाणार आहे.  

दरम्यान, हरिद्धारमध्ये गेल्या 24 तासांच 386 करोना रुग्ण आढळले आहेत. शहरात सध्या 2056 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन आणि ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत जवळपास 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 4 एप्रिलला शहरात 173 रुग्ण आढलले होते तर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 837 होती.

Related Stories

पाकिस्तानकडून 3800 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

datta jadhav

हिमाचल प्रदेश : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

datta jadhav

पश्चिम बंगाल : कॅन्टोन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत वाढवले लॉकडाऊन

pradnya p

6 ते 6.5 टक्के दराने देशाचा आर्थिक विकास

Patil_p

केंद्र सरकार आणतेय ‘संस्कारी’ गेम्स

Patil_p

योगी सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 418 कोटी रुपयांची मदत

pradnya p
error: Content is protected !!