तरुण भारत

साखळीतील सातेरी केळबाई देवीच्या कळसोत्सवाची सांगता

रविवारी मंदिरात कौलोत्सव. गावठण, साखळी शहरासह वझरी गावातही भेटी

डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

गावठण साखळी येथील श्री सातेरी व केळबाई देवीच्या कळसोत्सवाची कल रविवारी (दि. 11) कळस मंदिरात गेल्यानंतर सांगता झाली. गावठण येथील देवी सातेरी केळबाई मंदिरात सामुहीक कौलोत्सव पार पडला.  या कळसांनी साखळी शहरातील सर्व घरांना भेटी दिल्या. बुध. दि. 8 एप्रिल रोजी रात्री देसाईनगर साखळी येथील श्री सिध्दीविनायक मंदिरात भेट दिली. यावेळी देसाईनगर भागातील भाविकांनी देवाची मोठय़ा श्रध्देने सेवा केली.

गावठण साखळी येथील श्री सातेरी व केळबाई देवीचे कळस गेल्या शनि. दि. 3 एप्रिल रोजी मंदिरातून भाविकांच्या घरांना भेटी देण्यासाठी बाहेर पडले होते. साखळी भाग सध्या शहरीकरण होत असला तरी या भागातील लोकांमध्ये देवाची भक्ती व श्रध्दा आजही कायम आहे. याची अनुभूती या शिमगोत्सवातील कळसोत्सवात येते. प्रत्येकजण आपापल्या घराबाहेर रांगोळी रेखाटून कळसांच्या स्वागताची तयारी करीत असतात. व घरात येणाऱया कळसाचे मनोभावे पुजा करून आटली सेवा रूजू करतात.

साखळी पंचायतान येणाऱया गावठण, साखळी व वझरी या गावात हे सातेरी व केळबाई देवीचे कळसरूपी देव घरोघरी फिरतात. गुरुवारी रात्री या कळसांनी देसाईनगर येथील श्री सिध्दीविनायक मंदिरात भेट दिली. देवस्थान समिती व भाविकांनी कळसांचे स्वागत केले. मंदिरात स्थानापन्न करण्यात आलेल्या कळसांचे सर्व भाविकांनी दर्शन घेतले. सुवासिनी महिलांकडून देवीची ओटी भरली. त्यानंतर सामुहिक गराणे घातल्यानंतर कळस मंदिरातून बाहेर काढून आपल्या पुढील प्रवासाला निघाले. यावेळी देवस्थान अध्यक्ष सुदेश काणेकर, तनाजीराव देसाई, धनंजय वाळके, सुधाकर डिचोलकर, ज्ञानेश्वर चोपडेकर, अजित गावकर, पांडुरंग पित्रे, गोपालकृष्ण कामत, सुरेश देसाई, योगेश लवंदे, सुनील राणे, अशोकराव देसाई व इतर स्थानिकांची उपस्थिती होती.

साखळीत घरोघरी फिरल्यानंतर सदर कळस वझरी गावातील घरांना भेटी दिल्या व रवि. दि. 11 एप्रिल रोजी रात्री कळस गावठण येथील मंदिरात दाखल झाले. या मंदिरात सामुहिक कौलोत्सव झाल्यानंतर या कळसोत्सवाची सांगता झाली.

Related Stories

कोरोना – नव्याने 540 रुग्णांची भर

Patil_p

मांद्रे येथील सिद्धांत गोवेकरला एम्स हृषिकेषमध्ये प्रवेश

Patil_p

रमेश वंसकर यांच्या ‘फुलराणीस’ संत नामदेव बाल साहित्य पुरस्कार

Omkar B

आंध्रमधून आलेली मासळी ठरली घातक

Omkar B

मेळावलीवासियांना म्हाऊस, खोतोडाचेही समर्थन

Patil_p

घरात घुसून महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!