तरुण भारत

काँग्रेसतर्फे ‘युनायटेड प्रंट ऑफ केपे’ पॅनलचे उमेदवार जाहीर

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची पत्रकार परिषदेत घोषणा,पराभवाच्या भीतीने भाजप उमेदवार जाहीर करतन सल्याचा दावा

वार्ताहर / केपे

Advertisements

केपे पालिका निवडणुकीत भाजप समर्थक उमेदवार जाहीर केले, तर ते पराभूत होतील या भयाने उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर व भाजप आपले उमेदवार जाहीर करत नाही. आपण त्यांना आव्हान देतो की, त्यांनी आपले उमेदवार जाहीर करून दाखवावेत, असे उद्गार काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केपे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काढले. ते केपे पालिका निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या ‘युनायटेड प्रंट ऑफ केपे’ पॅनलचे उमेदवार जाहीर केल्यानंतर बोलत होते.

यावेळी केपे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष मानुएल कुलासो, एल्टन डिकॉस्ता, सांजिल डिकॉस्ता, ऍड. जॉन फर्नांडिस व इतर हजर होते. कुडचडे व काणकोणमध्ये पालिका निवडणुकीत जी गत झाली तशी केपेत होणार या भयाने भाजप पॅनल जाहीर करत नाही. जे विजयी होतील त्यांना मुख्यमंत्र्यांकडे नेऊन छायाचित्र काढून आपले म्हणण्याची नवी पद्धत त्यांनी सुरू केली आहे, असे यावेळी चोडणकर म्हणाले.

प्लॉटचे आमिष दाखविल्याचा दावा

आतापर्यंत देशात पैसे व धमक्मयांच्या बळावर उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावण्याच्या पद्धती दिसून आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी केपेतही असेच झाले होते. मात्र आता त्याच्या पलीकडे जाऊन उमेदवाराने उमेदवारी मागे घ्यावी याकरिता प्लॉटची ऑफर देण्याचे प्रकार घडलेले आहेत. मात्र कोणताही उमेदवार या आमिषाला बळी पडला नसल्याने सर्व उमेदवारांचे अभिनंदन, असे ते पुढे म्हणाले.

कोणत्याच आमिषापुढे न झुकता पुढे आलेल्या या सर्व उमेदवारांना केपेकरांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन चोडणकर यांनी केले. तसेच असे बेहिशेबी प्लॉट्स व अन्य मालमत्तांची ‘ईडी’ने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. पालिका निवडणुकीत प्लॉट देण्याच्या ऑफर येतात यावरून किती बेहिशेबी मालमत्ता आहे ते स्पष्ट होते, असा दावा त्यांनी केला. तसेच जुन्या भाजप मतदारांकडे जाताना ‘कवळेकर म्हणून नव्हे, तर भाजप म्हणून मते द्या’, तर काँग्रेस मतदारांकडे जाताना ‘भाजप म्हणून नव्हे, तर कवळेकर यांना मते द्या’ असा प्रचार केला जात आहे. या अशा प्रचाराला बळी न पडता एका पक्षातून दुसऱया पक्षात उडी मारणाऱयांना लोकांनीच धडा शिकवावा, असे आवाहन चोडणकर यांनी केले.

12 प्रभागांमध्ये उमेदवार जाहीर

केपे पालिका निवडणुकीत युनायटेड प्रंट ऑफ केपे पॅनल जिकून येणार असून जाहीरनाम्यात जी आश्वासने दिलेली आहेत ती पूर्ण करू, असे कुलासो यानी सागितले. तसेच प्लॉट, पैसे अशा आमिषांना बळी न पडता व धमक्मयांना न घाबरता उमेदवारी मागे न घेतलेला सर्व उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले. या पॅनलखाली तेरा प्रभागांपैकी बारा प्रभागांमध्ये उमेदवार जाहीर केले असून प्रभाग 12 मधून जास्त काँग्रेस समर्थक उतरलेले असल्याने या प्रभागात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

प्रभाग 1 मध्ये जगदीश गवळी, 2 मध्ये राजेश नाईक, 3 मध्ये नझमोनिशा खान, 4 मध्ये योगेश बेणे, 5 मध्ये नेश्विन मार्टीन्स, 6 मध्ये प्रतीका मडगावकर, 7 मध्ये चेतन नाईक, 8 मध्ये मानुएल कुलासो, 9 मध्ये जेकिना डायस, 10 मध्ये नंदिता प्रभुदेसाई, 11 मध्ये लाक्येडा आलिंदा जोनिता, तर प्रभाग 13 मध्ये पावलिना फर्नांडिस असे पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी केपे मतदारसंघातील काही आप नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Related Stories

काणकोणातील मार्केट यार्डात काजुविक्रीसाठी शेतकऱयांची गर्दी

Patil_p

अभिनय कसा करतात मला माहित नाही मला फक्त जगता येते : अभिनेत्री थाहिरा

Shankar_P

आमदार अपात्रता 20 रोजी सुनावणी

Amit Kulkarni

सातपैकी एक रुग्ण कोरोनामुक्त

Omkar B

डिचोली अबकारी खात्यातर्फे सुमारे 4.50 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त.

Omkar B

आयआयटी आंदोलन मोडीत काढण्याचे सरकारचे षडयंत्र

Patil_p
error: Content is protected !!