तरुण भारत

नानोडा येथील वैशिष्टय़पूर्ण घोडेमोडणी आज

डिचोली/प्रतिनिधी

नानोडा गावातील वैशिष्टय़पूर्ण अवसारी घोडेमोडणी आज सोम. दि. 12 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. शिमगोत्सवात नानोडा गावात साजऱया होणाऱया या घोडेमोडणीला विशेष महत्त्व असून सर्व देवतांचा मान या घोडय़ांकडून राखला जातो.

Advertisements

या घोडेमोडणीला ग्रामदेवी श्री सातेरी पुरमार मंदिराकडून देवाला गाराणे घालून प्रारंभ होतो. तेथून घोडे चव्हाटेश्वर मंदिराला मखं देऊन थेट श्री शांतादुर्गा मंदिरात येतात. मंदिरात त्यांची मानकऱयांकडून विधीवत पुजा करण्यात येते. पुजा अर्चा झाल्यानंतर घोडे व्यंकटेश मंदिराकडील पिंपळाकडील स्थानाला मान देऊन त्याच वाटेने पूढे जात भूतनाथ रवळनाथ मंदिराला मान देतात. हा मान दिल्यवर त्यांची मानकऱयांकडून पुजा अर्चा केली जाते. त्यानंतर पारंपरिक वाटेने मुळगावच्या सीमेकडील सखळेश्वर घुमटीला मान दिला जातो. त्याच स्थनाकाडे घोडय़ांवर अवसार येतो.

त्या स्थानाला घोडय़ांकडून मान दिल्यानंतर मुख्य रस्त्यावरून चालत येत घोडे कासरपाल येथील उभा गुंडा या स्थानाला भेट देतात. तेथून त्यांना माघारी फिरविले जाते. येताना वाटेत लोकांकडून त्यांची पुजा केली जाते. मग ते पारंपरिक वाटेने पाण्यातून माग काढत क्लब समोरील जुन्या स्थानाकडे दाखल होतात. तेथे अल्प वेळ विश्रांती घेतली जाते. पुर्वापार परंपरेप्रमाणे चालत आलेल्या या घोडेमोडणीत विविध विधी किंवा मानपान झाल्यावर काही अंतरावर असलेल्या स्थानावर घोडय़ांवर अवसार येतो. तेथून त्यांना परतविल्यावर प्रत्येक स्थानाला मान देऊन श्री सातेरी मंदिरात त्यांना देवीचे तीर्थ दिल्यावर घोडेमोडणीची सांगता होते.

Related Stories

समाजाने पुरोहितांचा जरूर विचार करावा

Patil_p

गुन्हा शाखेच्या पोलिसांतर्फे रिक्षावाले व पायलटांना मदत

Omkar B

पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात युवा काँग्रेसची रॅली

Patil_p

प्रेक्षकांविना खेळतानाही जोश कमी होणार नाही

Patil_p

भारताचे राष्ट्रीय फुलपाखरू निवडण्याची जनतेला संधी

Patil_p

दहावी परीक्षेचा निणर्य योग्यच

Omkar B
error: Content is protected !!