तरुण भारत

गोवा-बेळगाव महामार्ग चकचकीत

दुरुस्ती पूर्ण, आता प्रवास होणार आरामदायी

वाळपई / प्रतिनिधी

Advertisements

गेल्या जवळपास एक वर्षापासून सातत्याने गोवा बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरातील रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी अखेर पूर्णत्वास आलेली आहे.

सध्यातरी घाटमाथ्यावरील रस्ता वाहतुकीसाठी चकचकीत झाला असून आता प्रवास करताना निसर्गाचा मनमुरादपणे आनंद लुटा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

 गोवा ते बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरातील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रवाशाने लावून झाली होती. यासंदर्भाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार करून तो मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात  कामाला अडचण निर्माण झाली होती.

 त्याचप्रमाणे कंत्राटदाराने सदर रस्त्याचे काम अत्यंत धीम्यागतीने सुरू केले होते. त्यामुळे प्रवासीवर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मात्र कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामाला गती निर्माण केल्यानंतर सध्यातरी घाटमाथ्यावरील रस्ता पूर्णपणे चकचकित झालेला आहे.

 दरम्यान या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार साखळी ते चोर्ला मार्ग गोवा हद्दीपर्यंत या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाला मान्यता मिळालेली आहे.  याबाबत वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या रस्त्याचे पूर्ण हॉटमिक्स डांबरीकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र ऐनवेळी या रस्त्याचा ताबा महामार्ग यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून या संदर्भाच्या कामाची पूर्तता करण्यात येत आहे.

Related Stories

बांदोडा येथील दीपोत्सव मर्यादित स्वरुपात

Patil_p

श्रावणी सोमवार दिंडी उत्सव समितीतर्फे श्री दामोदर चरणी श्रीफळ अर्पण

Omkar B

कलखांब येथे लक्ष्मी मंदिरात चोरी

Patil_p

जायचे होते कोप्पळला… पोहोचले बेळगावात!

Amit Kulkarni

उचगाव येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

Omkar B

सांगेचा प्रभाग 1 अनु. जमातींसाठी राखीव ठेवल्याने तीव्र नाराजी

Patil_p
error: Content is protected !!