तरुण भारत

होंडा येथील ‘हिंदुस्तान एरोनॉटिकल’ चार वर्षापासून बंदच

कंपनी सुरू झाल्यास सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची चांगली संधी

वाळपई / प्रतिनिधी

Advertisements

सत्तरी तालुक्मयात व गोवा राज्यातील एरोनॉटिकल इंजिनिअर्सना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा हिंदुस्थान एरोनॉटिकल कंपनी लिमिटेडचा दरवाजा गेल्या चार वर्षापासून बंदच आहे. यामुळे या कंपनीचा दरवाजा उघडून बेरोजगारांना नोकरीची संधी कधी उपलब्ध होणार असा सवाल आता बेरोजगार युवकाकडून करण्यात येत आहे. चार वर्षांपूर्वी गाल कंपनीच्या जागी हिंदुस्तान एरोनॉटिकल कंपनी सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विशेष योगदान दिले होते. मात्र चार वर्षांपासून या कंपनीचा दरवाजा अजून पर्यंत उघडलेला नाही. यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

 गाल कंपनी बंद करून एच.ए.एल.कंपनी.

 अनेक वर्षे होंडा औद्योगिक वसाहतीमध्ये गाल कंपनीचा कारभार सुरू होता. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कामगार काम करीत होते. त्या कंपनीच्या माध्यमातून होंडा औद्योगिक वसाहतीमधील लघुउद्योगांना चांगल्या प्रकारची संधी प्राप्त झाली होती. मात्र सरकारने सातत्याने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे व एका तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकाने मनमानी कारभार केल्यामुळे गाल कंपनी शेवटी सरकारलाच बंद करावी लागली. त्याच ठिकाणी सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड कंपनीचा कारभार सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याठिकाणी हेलिकॉप्टर इंजिन बांधणी व त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने सदर कंपनीचा कारभार सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. तत्कालिन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व स्थानिक आमदार प्रतापसिंह राणे यांनी संयुक्तरित्या या भागांमध्ये भेट देऊन या कंपनीच्या कारभाराचे पाहणी केली होती. चार वर्षांपूर्वी या ठिकाणी कंपनी सुरू होणार असल्यामुळे या भागातील कमी शिक्षित तरुण तरुणीना नोकरीची संधी प्राप्त होणार असल्याने आनंद व्यक्त करण्यात आला होता. मात्र एकाच दिवशी उघडलेला दरवाजा बंद झाला मात्र तो अजून पर्यंत उघडला नाही.

 लघूउद्योगांना चांगली संधी मिळणार.  या कंपनीचा कारभार सुरु झाल्यास औद्योगिक वसाहतीमध्ये निर्माण झालेली मरगळ दूर होऊन लघुउद्योगांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे. सरकारचे दुर्लक्षामुळे अनेक प्रकल्प आजारी अवस्थेत सापडलेले आहेत. त्यांना सरकारच्या पाठबळाची गरज आहे. हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड कंपनी ही गोव्यातील एकमेव कंपनी ठरणार आहे. याठिकाणी एरोनॉटिकल शिक्षण घेतलेल्या मुलांना नोकरीची संधी प्राप्त होणार होती. यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारची मागणी सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी केलेली आहे.

Related Stories

आमदार अपात्रता सुनावणी 3 रोजी

Patil_p

पेडणेतील शेतकऱयांच्या जमिनी हडप केल्याच्या कृतीचा काँग्रेस पक्षातर्फे निषेध

Amit Kulkarni

न्यू मार्केटमधील आगीच्या घटनेस पत्त्यांचा सोस कारणीभूत ?

Omkar B

गोव्याचे माजी सभापती अनंत शेट यांचे निधन

Omkar B

दैवज्ञ ब्राह्मण स्वामी आज 31 पासून दोन दिवस गोवा दौऱयावर

Patil_p

जनमत कौलदिन सभेचे आमंत्रण नसल्याने उपस्थित राहिलो नाही

Amit Kulkarni
error: Content is protected !!