तरुण भारत

वाढत्या रुग्णांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली

दिवसभरात 525 जण कोरोनाबाधित : दोघांचे बळी

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून गेल्या 24 तासांत म्हणजे रविवारी 525 जणांना बाधा झाल्याचे समोर आले आह। तर 170 जण बरे होऊन घरी परतले. रविवारी आणखी दोघांचा बळी गेल्यामुळे मृतांचा आकडा 848 वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांचा 4000 चा टप्पा पार झाला असून एकूण आकडा 4322 वर गेला आहे.

संशयित रुग्ण म्हणून 57 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 216 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत मिळून एकूण रुग्णसंख्या 62,304 झाली असून त्यातील 57,134 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे. गोव्यात विविध मार्गाने आलेले 19 प्रवासी पर्यटक कोरोनाबाधित सापडले असून वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

विविध आरोग्य केंद्रातील कोरोना आकडेवारी पुढील प्रमाणे-

डिचोली -95, सांखळी-100, पेडणे-87, वाळपई-40, म्हापसा-253, पणजी -311, हळदोणा-68, बेतकी-23, कांदोळी- 299, कासारवर्णे-22, कोलवाळ-65, खोर्ली-114, चिंबल-128, शिवोली-151, पर्वरी-437, मये-32, कुडचडे-61, काणकोण-74, मडगाव-438, वास्को-206, बाळ्ळी-50, कासावली-140, चिंचिणी-69, कुठ्ठळी-172, कुडतरी-53, लोटली-59, मडकई-31, केपे-27, सांगे-87, शिरोडा-63, धारबांदोडा-41, फोंडा-335, नावेली-72.

  • 11 एप्रिलपर्यंत एकूण रुग्ण –     62304
  • 11 एप्रिलपर्यंत बरे झालेले रुण-    57134
  • 11 एप्रिलपर्यंत सक्रिय रुग्ण-        4322
  • 11 एप्रिल रोजी नवीन रुग्ण-         525
  • 11 एप्रिल रोजी बरे झालेले रुग्ण-      170
  • 11 एप्रिल रोजी बळी- 2
  • आतापर्यंतचे एकूण बळी             848

Related Stories

शैलेश नाईक विरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार

Omkar B

सत्ता मिळाली, आता रंगणार नगराध्यक्षपदासाठी चढाओढ

Amit Kulkarni

सर्व टॅक्सांना 1 मे पासून मीटर्सची सक्ती

Amit Kulkarni

ट्रक टायर फुटून दुभाजक ओलांडून दरीत

Patil_p

येत्या काळात गोवा शैक्षणिक हब म्हणून उदयास येईल

Amit Kulkarni

बायणा वास्को येथे स्वातंत्र्यदिनी कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Omkar B
error: Content is protected !!