तरुण भारत

‘मस्की’ पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह

बेंगळूर : मस्की विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार प्रतापगौडा पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत स्वतः त्यांनी माहिती दिली आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान, मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह अनेक मंत्री, भाजप नेत्यांनी प्रतापगौडा यांच्या संपर्कात आल्याने त्यांना भीती निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच प्रतापगौडा यांनी कोरोनाची लस घेतली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण उपचार घेत आहे. काळजी करण्याची गरज नाही. लवकरच मी बरा होईन. 17 रोजी पोटनिवडणूक असून मतदारांनी आशीर्वाद देत भाजपला मतदान करावे. तसेच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रतापगौडा पाटील यांनी केले आहे.

Related Stories

कुमारस्वामींनी घेतली कोरोना लस

Shankar_P

कर्नाटक: वीज दरवाढीमुळे अनेक उद्योग बंद होतील: एफकेसीसीआय

Shankar_P

बेंगळूर : पोलिसांसाठी आगळी वेगळी पोर्टेबल केबिन

Shankar_P

राजीनामा स्वीकारल्यानंतर रवि यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट

Shankar_P

बेंगळूरला लसीचे ३ लाख डोस मिळणार

Shankar_P

राज्यात ३ हजार लसीकरण केंद्रे कार्यान्वित होणार : आरोग्यमंत्री

Shankar_P
error: Content is protected !!