तरुण भारत

कर्मचारी कामावर हजर न राहिल्यास वेतन कपात करणार : मुख्यमंत्री

बेंगळूर : परिवहन कर्मचारी तात्काळ कामावर हजर न राहिल्यास त्यांचे वेतन कपात करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिला आहे. रायचूर जिल्हय़ातील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. संपाला संबंधित कोणालाही चर्चेसाठी आवाहन करणार नाही. तसेच याविषयावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कर्मचाऱयांनी आदराने कामावर हजर रहावे. वाहतूक व्यवस्थेत झालेल्या समस्यांना परिवहन कर्मचारीच जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील पोटनिवडणुकीत जनतेचा कौल भाजपच्या बाजूने असल्याने मतदारांनी भाजप विरोधात बोलणाऱया माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमारांना योग्य धडा शिकवतील, असेही ते म्हणाले.

Related Stories

कर्नाटकः केईएने आर्किटेक्चरच्या प्रवेश रँकची यादी रोखली

Shankar_P

कर्नाटक राज्य पाणीपुरवठा मंडळाचे निवृत्त अभियंता प्रसन्न मूर्ती यांचे निधन

Rohan_P

कर्नाटकातील ४ हजार शेतकरी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात सहभागी होणार

triratna

‘त्या’ तरूणीचं काही बरेवाईट झाल्यास मुख्यमंत्री, गृहमंत्री अन् भाजप जबाबदार

triratna

पदवी, अभियांत्रिकी महाविद्यालयांना स्वायत्तता

Omkar B

कर्नाटकमध्ये बुधवारी कोरोनाचे ६,९९७ नवीन रुग्ण

triratna
error: Content is protected !!