तरुण भारत

धोका वाढला : दिल्लीत रविवारी 10 हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्ण

  • कोरोना बाधितांनी ओलांडला 7.25 लाखांचा टप्पा 


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर केले आहे. रविवारी 10 हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे राजधानीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील 24 तासात 10 हजार 774 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 48 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Advertisements


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारी नुसार, मागील 24 तासात 5,158 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 7 लाख 25 हजार 197 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 6 लाख 79 हजार 573 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 11,283 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू दराचे प्रमाण 1.56 % इतके आहे. सद्य स्थितीत 34,341 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 55 लाख 58 हजार 243 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 76,954 आरटीपीसीआर टेस्ट आणि 37,334 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 9.43 % आहे. तर 5,705 झोन आणि 1,291कंट्रोल रूम आहे.

Related Stories

पाँडिचेरीत काँग्रेस सरकार अल्पमतात

Patil_p

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले प्लाझ्मा दान

pradnya p

पश्चिम बंगालमध्ये गेमचेंजर ठरणार दलित

Patil_p

देशात मिळणार केवळ ‘बीआयएस’ प्रमाणित हेल्मेट

Patil_p

उद्योगांसाठी सरकारच्या पायघडय़ा

Patil_p

कुख्यात गुंड विकास दुबेचा साथीदार पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

datta jadhav
error: Content is protected !!