तरुण भारत

पहिल्या रेल्वेगेटची दुरुस्ती

अपघातामुळे वाकले फाटक : वाहनचालकांची गैरसोय

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

पहिले रेल्वेगेट येथे शनिवारी एका ट्रकचा अँगल अडकून फाटकाचे नुकसान झाले होते. यामुळे फाटक वाकले असल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आले होते. रेल्वे कर्मचाऱयांकडून या रेल्वे फाटकाच्या दुरुस्तीचे काम केले जात होते. यामुळे प्रवाशांना दुसऱया रेल्वेगेटमार्गे प्रवास करावा लागला.

फाटकाचा एक भाग ट्रकच्या मागील अँगलमध्ये अडकल्याने फाटक वाकले. त्यामुळे शनिवारी हे रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळपासून रेल्वे फाटकाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पहिल्या रेल्वेगेटमार्गे होणारी वाहतूक दुसऱया व तिसऱया रेल्वे गेटमार्गे वळविण्यात आली. परंतु यामुळे दुसऱया रेल्वेगेट परिसरात वाहतुकीची कोंडी झाली.

पहिल्या व दुसऱया रेल्वेगेटवर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. रेल्वेगेट कोसळून पडण्याचे प्रकारही घडले आहेत. यामुळे वारंवार रेल्वेगेट बंद राहिल्याने याचा फटका स्थानिक रहिवासी व प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या साहित्याचा वापर करून रेल्वेगेट बसवावे, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

Related Stories

कर्नाटक: वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना कोरोना परिस्थितीबद्दल दिली माहिती

triratna

कारवार केंद्राऐवजी दहावी विद्यार्थ्यांची सोय गोव्यातच करावी

Patil_p

गुजरात नवरात्र उत्सव मंडळातर्फे राम मंदिरासाठी भरघोस निधी

Amit Kulkarni

रिक्षाचालकाकडे पत्रकार असल्याचे ओळखपत्र

Amit Kulkarni

‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाला हरताळ!

Patil_p

पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण

Patil_p
error: Content is protected !!