तरुण भारत

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडा

जिल्हाधिकाऱयांच्या सूचना : निवडणूक निरीक्षकांच्या बैठकीत पूर्वतयारीसंबंधीचा घेतला आढावा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मतदान प्रक्रियेत कसल्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत, याची अधिकाऱयांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी सांगितले.

जिल्हा पंचायत सभागृहात रविवारी निवडणूक निरीक्षकांच्या बैठकीत पूर्वतयारीसंबंधीचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱयांनी वरील सूचना दिल्या आहेत. निवडणूक कर्तव्यात हजर होण्यासाठी बससुविधा पुरविली जाईल. 16 एप्रिल रोजी तुमची नियुक्ती कोठे झाली
आहे याची माहिती दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱयांनी बैठकीत सांगितले.

मतदान केंद्र अधिकाऱयांनी मतदानावेळी तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, याची खबरदारी घ्यावी. यासाठी मतयंत्रे पडताळून पहावीत. कसल्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यास तातडीने वरि÷ अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून द्यावे. मायक्रो निरीक्षकांना पास, ओळखपत्र, नेमणूकपत्र देण्यात येणार आहे. मतदानाच्या एक दिवस आधी किंवा मतदान सुरू होण्यापूर्वी एक तास आधी मतदान केंद्रावर पोहोचण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.

मतदानानंतर वरि÷ अधिकाऱयांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मतदानासंबंधीची माहिती व दिवसभरातील घडामोडींची माहिती विहीत नमुन्यात द्यावी. मायक्रो निरीक्षकांनी मतदान एजंटांची उपस्थिती व एफसीएल सूचनांचे पालन करावे. निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार मतदारांची व्यवस्थित ओळख पटवून घ्यावी. मतदारांच्या बोटाला शाई लावणेही सक्तीचे आहे, अशा सूचना अधिकाऱयांना केल्या.

सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे

गुप्त मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे. यासंबंधी एजंटांकडून कसल्याही प्रकारच्या तक्रारी आल्यास त्यांचे निराकरण करावे. दुपारी 3 व 5 वाजता किती जणांनी मतदान केले आहे, आणखी किती  मतदान बाकी आहे याचा तपशील द्यावा, अशी सूचना लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नियुक्त सामान्य निरीक्षक चंद्रभूषण त्रिपाठी यांनी दिली.

Related Stories

बाळेकुंद्री खुर्द परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात

Amit Kulkarni

शास्त्रीनगर नाल्यावरील अतिक्रमण थांबवा

Patil_p

कॅन्टोन्मेंटचे कामकाजही आता ऑनलाईन

Patil_p

दक्षता हॉस्पिटलमध्ये हृदय दिनाचे आचरण

Patil_p

बेळगावचा युवक करणार सुदृढ भारतासाठी सायकल प्रवास

Patil_p

महिला आघाडीतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप

Patil_p
error: Content is protected !!