तरुण भारत

समितीचा अनगोळ येथे प्रचार-पदयात्रा

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनगोळ विभागाच्यावतीने रविवारी सकाळी अनगोळ परिसरात प्रचार करण्यात आला. अनगोळच्या प्रमुख गल्ल्यांमधून पदयात्रा काढून मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. सीमाप्रश्नाच्या लढय़ाला बळकटी देऊन मराठी बाणा दाखवून देण्यासाठी समितीलाच मतदान करा, असे आवाहन मराठी भाषिक युवकांनी मतदारांना केले.

Advertisements

विद्यानगर येथून या प्रचारफेरीला सुरुवात झाली. मारुती गल्ली, झेरे गल्ली, लक्ष्मी गल्ली, भांदुर गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, राजहंस गल्ली, वाडा कंपाऊंड येथे घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. या प्रचारफेरीवेळी माजी महापौर किरण सायनाक, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, अनिल मुचंडीकर, राकेश पलंगे, मोहन भांदुर्गे यांच्यासह म. ए. समितीचे निष्टवान कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

आज या भागात होणार प्रचार

सोमवार दि. 12 एप्रिल रोजी शुभम शेळके यांचा खासबाग, जुनेबेळगाव परिसरात प्रचार होणार आहे. सकाळी 11 वा. टीचर्स कॉलनी खासबाग, कुंतीनगर, शृंगेरी कॉलनी, दुपारी 3 वाजता रणकुंडये, किणये, बहाद्दरवाडी, जानेवाडी, कर्ले त्यानंतर सायंकाळी 6 वा. बसवेश्वर सर्कल खासबाग, भारत नगर, जुनेबेळगाव, वडगाव कारभार गल्ली येथे प्रचार केला जाणार आहे.

Related Stories

मनपा करणार खुल्या जागांचे सर्वेक्षण

Patil_p

बॅन्डेड रोडचा भाव चढताच…

Patil_p

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची निदर्शने

Patil_p

शहराच्या विविध भागात दुषित पाणी पुरवठा

Patil_p

टिळकवाडीतील कचरा उचलण्याकडे कानाडोळा

Patil_p

घातक कचरा उचलीसाठी मनपाचे पाऊल

Patil_p
error: Content is protected !!