तरुण भारत

समितीच्या सिंहाला दिल्लीत पाठवून देण्याचा निर्धार

शुभम शेळके यांचा पश्चिम भागात प्रचार : गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद : गावागावांतून पाठिंबा : कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग

वार्ताहर / किणये

Advertisements

सीमाप्रश्नाच्या लढय़ाला बळकटी देण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना निवडून देण्याचा निर्धार पश्चिम भागातील कार्यकर्त्यांनी केला आहे. समितीच्या सिंहाला दिल्लीत पाठवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असून शेळके यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून शुभम शेळके निवडणूक लढवित आहेत. पश्चिम भागातील विविध गावांमध्ये त्यांची प्रचारफेरी व सभा घेण्यात आली. त्यांच्या प्रचाराला तरुण मोठय़ा संख्येने सहभागी होऊ लागले आहेत. त्यामुळे तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सीमाबांधवांवर सातत्याने अन्याय होत आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तरुण पिढी अधिक सक्रिय झाली आहे. शनिवारी नंदिहळ्ळी, देसूर, झाडशहापूर, वाघवडे आदी गावांमध्ये प्रचारफेरी काढण्यात आली.

सायंकाळी मच्छे येथे प्रचारसभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कृष्णा अनगोळकर होते. शुभम शेळके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात
आले.

राष्ट्रीय पक्षांच्या भूलथापांना बळी पडू नका, विकासाच्या नावावर सीमाबांधवांच्या भावनाच दुखावल्या गेलेल्या आहेत. हीच वेळ आहे आम्हा सीमाबांधवांची ताकद दाखवून देण्याची. शुभम शेळके यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी यावेळी केले.

यावेळी भागोजी पाटील, महादेव पाटील, संजय सुळगेकर, रमेश कऱयाण्णवर, महादेव मंगणाकर, गजानन छत्रे, अमोल लाड, केदारी करडी, सागर कणबरकर आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रविवारी सकाळी मजगाव, पिरनवाडी, खादरवाडी, हुंचेनहट्टी, बाळगमट्टी, बामणवाडी, नावगे आदी गावांमध्ये प्रचारफेरी काढण्यात आली. प्रचारफेरीत तरुणांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला होता.

नावगे गावात प्रचारफेरी काढण्यात आली. प्रारंभी शुभम शेळके यांनी रामलिंग देवस्थानचे पूजन केले. यावेळी शुभम शेळके यांना पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी सूर्यकांत कर्लेकर, बसवाणी सुतार, कल्लाप्पा चिगरे, चांगाप्पा यळ्ळूरकर, अरुण गुरव, परशराम सुरुतकर, कृष्णा बेळगावकर, रामलिंग सुतार, सागर पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

रविवारी सकाळी खादरवाडी गावात प्रचारफेरी काढून सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी रमेश पाटील होते. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना पाठिंबा दर्शवून विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, मदन बामणे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरल, कल्लाप्पा पाटील, महादेव शिवनगेकर, परशराम गोरल, दिलीप पाटील, शामराव पाटील, अशोक पिंगट, प्रकाश नेसरकर, पिराजी डोळेकर, माजी नगरसेविका रूपा नेसरकर, सुधा भातकांडे आदींसह खादरवाडी परिसरातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

निपाणीत ख्रिसमस उत्साहात साजरा

Omkar B

कराटे स्पर्धेत संत मीरा मराठी शाळेचे यश

Amit Kulkarni

उद्यमबाग परिसरात विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई

Patil_p

सुभाषचंद्र बोस यांची विचारसरणी सर्वांना मार्गदर्शक

Amit Kulkarni

काळय़ादिनी काळे ध्वज, काळा मास्क, काळी फीत

Patil_p

वनाधिकारी एस. एस. निंगानी यांचा जागतिक वनदिनी सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!