तरुण भारत

महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ; आज कॅबिनेट बैठकीत होणार अंतिम निर्णय

टास्कफोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत, आठ की चौदा दिवस याबाबत मतभिन्नता

प्रतिनिधी / मुंबई

Advertisements

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. रविवरी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही याबाबत एकमत झाले. मात्र तो किती दिवसांचा असावा याबाबत मतभिन्नता आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत लॉकडाऊनसंदर्भात अंतिम निर्णय होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाच वाजता टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. सुमारे दोन तास ही बैठक सुरु होती. यामध्ये यात लॉकडाऊनबाबत एकमत झाले. पण लॉकडाऊन केव्हा लागू करायचा करायचा आणि किती दिवसांचा असावा यावर मतभिन्नता होती. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषतः सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी. तसेच लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती परत एकदा पंतप्रधानांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान रात्री उशिरा मुख्य सचिवांबरोबर बैठक घेऊन मुख्यमंत्री सोमवारी सकाळी कॅबिनेटची बैठक घेतील आणि त्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता आहे. मात्र हा लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर असेल असेही सांगितले जात आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारणे, विद्युत शवदाहिन्या बांधणे आणि इतर पर्यायी व्यवस्था यावर चर्चा झाली. बेड्सची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता या विषयावर टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ञांनी चिंता व्यक्त केली. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे, असे मत डॉक्टर्सनी व्यक्त केले.

लॉकडाऊन जाहीर करण्याआधी राज्यातील जनतेला काही दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केली आहे.

एसओपी तयार करणे सुरु

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाशी लढा देताना  चाचण्या वाढवल्या, आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागफती केली, कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाटÎाने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठÎा प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे धोका निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल.

रेमडेसीवीरच अवाजवी वापर थांबिण्यावर चर्चा    

आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठÎा प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही चर्चा झाली. रेमडेसिवीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले.

टास्क फोर्सने दिल्या सूचना

95 टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागफती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी, मुंबई पालीकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला 6 मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत, तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे, ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सुचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणेएमबीबीएसच्या तफतीय वर्षातील विद्यार्थ्याचा, आयुष डॉक्टर्सचा  मोठ्या प्रमाणावर  उपयोग करून घेणे आदि सूचना करण्यात आल्या

ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले, सध्या 1200 मेट्रिक टन पैकी 980 मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. पेंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून तसेच देशपातळीवरील वाहतूकदरांशी चर्चा करून ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल त्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही ते म्हणाले

Related Stories

पालिकेच्या समोरची गळती काढण्याचे दोन दिवसांपासून काम सुरु

Patil_p

लाल किल्ला हिंसाचारातील आणखी एक आरोपी अटकेत

datta jadhav

सातारा तालुक्यातील ७४ जणांना पुरवठा विभागाच्या नोटीसा

triratna

कर्नाटकातून होणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करा : गृहराज्यमंत्री सतेज पाटील

Shankar_P

पुणे : मंदिरे नसलेल्या गणेश मंडळांना शासनाने मंडपाचा खर्च द्यावा

pradnya p

दिल्लीत महिन्यात तिसऱयांदा भूकंप

Patil_p
error: Content is protected !!