तरुण भारत

”भाजपचे सरकार आहे तिथे कोरोना पळून गेला कारण…”

मुंबई / ऑनलाईन टीम

कोरोना स्थितीवरून सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. यावरूवन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप मुंबईत माध्यमांशी बोलताना केला आहे. यावेळी त्यांनी जिथे भाजपचं सरकार नाही तीच राज्यं अपयशी ठरली आणि जिथे सरकार आहे तिथे करोना पळून गेला कारण तिथे भाजपचे मुख्यमंत्री आहेत असं तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का?,” असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

केंद्राकडून महाराष्ट्रावर होणाऱ्य़ा आरोपवर माध्यमाशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्यं कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरली असं केंद्रीय सचिवांचं म्हणणं असेल तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचं अपयश आहे. कारण ही संपूर्ण लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लढली जात आहे. महाराष्ट्र कोरोना संदर्भातील प्रत्येक सूचनेचं, नियमाचं पालन करत आहे. जी तीन राज्यं अपयशी ठरलं असं सचिव म्हणत आहेत तिथे बिगरभाजपा सरकार आहे. म्हणजे जिथे भाजपाचं सरकार नाही तीच राज्यं अपयशी ठरली आणि जिथे सरकार आहे तिथे करोना पळून गेला…कारण तिथे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत असं तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का?,” असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले की, केंद्र सरकारने अशा प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशीलपणे वागायला पाहिजे. असे एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करु नयेत. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये अशा पद्धतीने कोरोनासंदर्भातील लढाई सुरु ठेवली आहे. आपलं राज्य मोठं आहे. पुणे, नागपूर, मुंबई ही मोठी शहरं आहेत. या शहरांवर संपूर्ण देशांचा भार आहे. याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे. लस, रेमडेसिवीर या गोष्टी भाजपच्या गुजरातमधील कार्यालयात हवी तेवढी मिळत आहेत. म्हणजे एका राजकीय पक्षाच्या मुख्यालयातून ती औषधं घेऊ शकतात पण महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला लस न देणं हा एकप्रकारे अमानुषपणा आहे. प्रशासनाला हाताशी धरुन संकटातही राजकारण केलं जात आहे. याचा निषेध करायला पाहिजे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सर्वात प्रथम याचा विरोधी केला पाहिजे कारण हा महाराष्ट्राचा देखील एकप्रकारे अपमान आहे. जर त्यांना अपमान वाटत नसेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा कसलाही अधिकार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Related Stories

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांचे निधन

pradnya p

लस निर्मितीचा मोदींनी घेतला आढावा

Patil_p

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.5 कोटींवर

datta jadhav

रत्नागिरी जिल्ह्यात आज 37 नवे रुग्ण तर तिघांचा मृत्यू तर

Shankar_P

जीवघेणी चुरस…अखेर रालोआच सरस

Omkar B

‘तुमच्याकडे चारच दिवस शिल्लक आहेत, जे करायचे ते करा’

pradnya p
error: Content is protected !!