तरुण भारत

रविवारी विविध मार्गांवर धावल्या 30 बसेस

परिवहन कर्मचाऱयांचा संप सुरूच

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मागील पाच दिवसांपासून वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी परिवहन कर्मचाऱयांनी पुकारलेला संप मागे न घेतल्याने परिवहन महामंडळ अडचणीत आले आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. परिवहनने देखील आक्रमक भूमिका घेत गेल्या दोन दिवसांपासून पोलीस बंदोबस्तात बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी बेळगाव बसस्थानकातून 25-30 बसेस विविध मार्गांवर धावल्या असल्या तरी प्रवासी वाहतुकीचा भार अद्याप खासगी वाहतुकीवर आहे.

परिवहन कर्मचारी आपल्या विविध मागण्यांवर ठाम आहेत मात्र राज्य सरकारने देखील सहावा वेतन आयोग लागू करण्यास यापूर्वीच नकार दर्शविला असून 10 टक्के वाढीव वेतन देण्याचे मान्य केले आहे. मात्र कर्मचाऱयांनी सहाव्या वेतन आयोगाची  मागणी लावून धरली आहे. त्यामुळे संपाचा तिढा अद्याप कायम आहे. या संपामुळे परिवहनला मोठा फटका बसत असून बेळगाव विभागाला दररोज 60 लाखाचे नुकसान सोसावे लागत आहे. बसस्थानकातून लांब पल्ल्यासह स्थानिक व वातानुकूलित बससेवा देखील ठप्प झाल्याने परिवहनचे उत्पन्न देखील थांबले आहे. शिवाय बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची संख्या देखील रोडावली आहे. बसेस बंद असल्याचा फायदा काही खासगी वाहनचालक घेत असून भरमसाट  भाडे आकारून प्रवाशांची लूट सुरू असल्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत आरटीओ शिवानंद मगदूम यांनी बस स्थानकाला भेट देऊन खासगी वाहनचालकांना समज दिली होती. मात्र काही खासगी वाहनचालकांनी याकडे दुर्लक्ष करून प्रवाशांकडून जादा भाडे आकारणी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

Related Stories

सोळा दिवसांनंतरही क्वॉरंटाईन व्यक्तीची मुक्तता नाही

Patil_p

प्रा. सुनिल जलालपुरे यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर

Omkar B

फिंगरप्रिंटवरून सोसायटीतील चोरी प्रकरणाचा छडा

Patil_p

भाग्यनगर येथे झाडांची पुन्हा कत्तल

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलजवळ अनोळखी युवकाचा मृत्यू

sachin_m

कर्नाटक : १ ऑगस्टपासून रविवारचा लॉकडाऊन, रात्रीचा कर्फ्यू हटवला

Shankar_P
error: Content is protected !!