तरुण भारत

उत्तराखंडात कोरोना : 1333 नवे रुग्ण; 8 मृत्यू

  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 7 हजार पार


ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात मागील 24 तासात 1333 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांनी 7 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कालच्या दिवसात 243 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Advertisements

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 31,285 नमुने निगेटिव्ह आले. प्रदेशातील एकूण संख्या 1 लाख 8 हजार 812 इतकी झाली आहे. त्यातील  97,887 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  


प्रदेशात उपचारा दरम्यान, आतापर्यंत 1760 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 7 हजार 323 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देहरादून, हरिद्वार, नैनिताल आणि उधमसिंह नगरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 


दरम्यान,  प्रदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले असून 89. 96% इतके झाले आहे. तर प्रदेशातील कन्टोनमेंट झोनची  संख्या देखील 52 झाली आहे. 

Related Stories

भारतात कोरोनाचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट

datta jadhav

इस्रो हेरगिरी प्रकरणी सीबीआयने कारवाई करावी

Patil_p

आजपासून टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’

Patil_p

लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

Abhijeet Shinde

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाचा सखोल तपास व्हावा

Patil_p

दोन दिवसात ‘दीड लाख’पार

Patil_p
error: Content is protected !!