तरुण भारत

महिमा चौधरींकडून भाजपचा प्रचार

सब्यसाची दत्ता यांच्यासाठी मागितली मते

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेसने अनेक चित्रपट कलावंतांना मैदानात उतरविले आहे. एकीकडे काही कलाकार पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. तर काही कलाकार प्रचारक म्हणून दिसून येत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीही आता भाजपसाठी प्रचारात उतरली आहे. तिने सोमवारी सकाळी लेक टाउन भागत भाजपच्या प्रचारमोहिमेत भाग घेतला आहे.

Advertisements

महिमा हिने येथील भाजप उमेदवार सब्यसाची दत्ता यांच्यासाठी प्रचार केला आहे. यापूर्वी कमरहाटी मतदारसंघात महिला तृणमूल काँग्रेसच्या प्रचाररॅलीत सामील झाली होती. तेथे तिने तृणमूल काँग्रेसचे उमेदवार मदन मित्रा यांच्यासाठी मते मागितली होती. तृणमूल आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी महिमा चौधरी किती लाभदायक ठरते हे येणारा काळच ठरविणार आहे.

समाजवादी पक्षाच्या नेत्या, खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन या देखील तृणमूलच्या प्रचारमोहिमेत दिसून आल्या आहेत. एका रोड शोदरम्यान त्यांनी एका कार्यकर्त्याला धक्का दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होत. हावडा येथे हा प्रकार घडला होता.

भाजपला मिथूनचे समर्थन महिमा आणि जया बच्चन यांच्यापूर्वी मिथून चक्रवर्ती हे देखील निवडणुकीच्या मैदानात दिसून आले आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मिथुन मागील काही दिवसांपासून भाजपसाठी सातत्याने प्रचार करत आहेत.

Related Stories

इराणमध्ये खामनेईंच्या विरोधात निदर्शने

Patil_p

यावर्षीचा अर्थसंकल्प आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणारा : गृहमंत्री

triratna

मोठय़ा हल्ल्याच्या तयारीत पाक

Patil_p

उत्तराखंडात 550 नवे कोरोना रुग्ण; 2 मृत्यू

pradnya p

कोरोना : उत्तर प्रदेशात 29,192 नवे रुग्ण; 38,687 जणांना डिस्चार्ज!

pradnya p

दिल्लीत 24 तासात 2024 नवे कोरोना रुग्ण; 22 मृत्यू 

pradnya p
error: Content is protected !!