तरुण भारत

टाटा मोटर्सकडून सवलतीची ऑफर

वृत्तसंस्था/ मुंबई

टाटा मोटर्सची लोकप्रियता अलीकडे मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या मार्चमध्ये कंपनीच्या कार विक्रीमध्ये समाधानकारक परिस्थिती दिसून आली आहे. कंपनी सध्या आपल्या काही कार मॉडेल्सची सवलतीत विक्री करत आहे. या सवलतीतील कार खरेदीची संधी ग्राहकांना 30 एप्रिलपर्यंतच घेता येणार आहे.

Advertisements

टाटा मोटर्सच्या हॅरियर या गाडीवर खरेदीदारांना 65 हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. याचप्रमाणे टाटा टियागो व टायगर सेडन या गाडय़ाही सवलतीत खरेदी करता येणार आहेत. टाटा टियागोवर 25 हजारापर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच टायगर सेडन 15 हजारपर्यंत स्वस्तात घेता येण्याची संधी असणार आहे. नेक्सॉन एसयुव्ही ही गाडी देखील 15 हजार रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येणार आहे. 

रेनॉच्या कार्सवर 75 हजाराची सूट

 दुसरीकडे टाटाच्या ऑफर्सचा विचार करून आता रेनॉनेही आपल्या काही कार्सवर सवलत जाहीर केली आहे. अगदी 75 हजारापर्यंतची सवलत कार खरेदीवर ग्राहकांना मिळू शकणार आहे. रेनॉची डस्टर गाडी 75 हजार रोख सवलतीसह खरेदी करता येईल तर याशिवाय काही कार मॉडेल्सवर 15 ते 30 हजाराची सवलत मिळणार आहे.

Related Stories

एमजी मोटारने विकल्या 710 कार्स

Patil_p

90 कि.मी. मायलेजवाली बजाजची दुचाकी दाखल

Patil_p

नवी टीव्हीएस झेस्ट 110 बाजारात

Patil_p

सुझुकीचा 10 लाख उत्पादनाचा टप्पा पार

Patil_p

बजाज ऑटोची विक्री पाच टक्क्यांनी वधारली

Patil_p

रॉयल इनफिल्डचा महिला बाईकस्वारांसाठी पेहराव

Patil_p
error: Content is protected !!