तरुण भारत

फ्लिपकार्टची अदानी ग्रुपसोबत भागीदारी

लॉजिस्टिक्स क्षेत्रात  2500 जणांना मिळणार रोजगार

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisements

लॉजिस्टिक्स क्षेत्रात फ्लिपकार्ट आता अदानी ग्रुपबरोबर भागीदारी करणार आहे. या भागीदारीच्या माध्यमातून येणाऱया काळात 2500 जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

चेन्नईत अदानीच्या डाटा केंद्राच्या माध्यमातून फ्लिपकार्ट आपली सेवा देणार आहे. लॉजिस्टिक्स व डाटा सेंटरच्या क्षेत्रात या भागीदारीनंतर फ्लिपकार्टला मोठा फायदा होणार आहे. अदानी ग्रुपबरोबर फ्लिपकार्टने व्यावसायिक भागीदारी करण्याचे सुनिश्चित केले आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रात कार्यरत असणाऱया अदानी लॉजिस्टिक्सच्या मदतीने फ्लिपकार्टला आपल्या साहित्याचा पुरवठा करणे आणखी सोयीचे होणार आहे. या क्षेत्रात भागीदारीतून 2500 जणांना नव्याने रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. चेन्नईत स्थापन केलेले अदानी कोनेक्स हे डाटा सेंटर एजकोवेक्स व अदानी एंटरप्रायझेस लि. यांनी संयुक्तपणे सुरू केले आहे.

सदरच्या महत्त्वाच्या भागीदारीनंतर फ्लिपकार्टची पुरवठा साखळी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. अदानीने आगामी काळात मुंबईत माल उतरवण्यासाठी 5.34 लाख चौ. फुट क्षेत्रफळाच्या जागेत साठवणूक गोडावून बांधण्याचे ठरवले आहे. यामुळे फ्लिपकार्टला आपला व्यवसाय वाढवता येईल.

Related Stories

फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास यांचा राजीनामा

Omkar B

पुढच्या वषी वनप्लसचे स्मार्टवॉच

Patil_p

एचडीएफसीचा मुदत ठेवींवर ज्येष्ठांसाठी विशेष व्याजदर

Patil_p

आगामी सहा महिने बँकांचा संप नाही?

Patil_p

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन वाढण्याची आशा

Patil_p

ऑटो क्षेत्राच्या अडचणी वाढल्या

Patil_p
error: Content is protected !!