तरुण भारत

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला

कोरोनाचा परिणाम -सेन्सेक्समध्ये 1700 अंकांची मोठी घसरण

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

कोरोनाचे वाढते रुग्ण आणि लॉकडाऊनमुळे शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण दिसून आली. सरतेशेवटी सेन्सेक्स 1700 अंकांनी कोसळला तर निफ्टी निर्देशांकातही 524 अंकांची घसरण दिसून आली.

दिवसभर पडझडीमुळे शेवटी सेन्सेक्स निर्देशांक 1707 अंकांच्या घसरणीसह 47,883.38 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 524 अंकांनी घसरून 14,310.80 अंकांवर बंद झाला. याआधी 29 जानेवारीला सेन्सेक्स 48,285 अंकांवर पोहचला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 29 समभाग घसरणीत होते. इंडसइंड बँकेचे समभाग 8.6 टक्के घसरले होते. तर डॉ. रेड्डिज लॅब्सचे समभाग मात्र 4.8 टक्के वधारले होते. टाटा मोटर्स, अदानी पोर्ट, इंडसइंड बँक आणि हिंडाल्कोचे समभाग सर्वाधिक घसरलेले पाहायला मिळाले.

देशात 24 तासात वाढलेली कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक ठरली आहे. इतर देशांच्या शेअर बाजारांमध्येही घसरण दिसून आली. चीनचा शांघाई कम्पोझीट, हाँगकाँगचा हेंगसेंग आणि जपानचा निक्केई निर्देशांकही घसरण नोंदवत होता. चौथ्या तिमाहीचे नफ्या-तोटय़ाचे अहवाल जाहीर व्हायचे असून परिणामी गुंतवणूकदार निराश आहेत. चौथ्या तिमाहीत कोरोनाचा परिणाम दिसू शकतो.

देशात सतत वाढणाऱया कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे गुंतवणूकदार तणावात आहेत. याचा परिणाम सोमवारी सकाळी शेअर बाजार खुला झाल्यावर दिसून आला. सेन्सेक्सचा निर्देशांक 634 अंकांनी घसरुन 48956.65 अंकावर खुला झाला. दुपारी तर सेन्सेक्स 1705 अंकांपर्यंत घसरला होता. आजच्या मोठय़ा घसरणीत बँकिंग क्षेत्रातल्या समभागांचा समावेश होता. निफ्टी बँक निर्देशांक 1733 अंकांनी म्हणजे 5.3 टक्के घसरला होता. आरबीएल बँकेचा समभाग 13 टक्के घसरला होता. सरकारी बँकांचे समभागही 10 टक्के इतके घसरले तर खासगी बँकांचे समभाग 6 टक्के घसरले.

Related Stories

जुलैमध्ये रत्ने-आभूषणांची निर्यात 38 टक्क्यांनी घटली

Patil_p

सोन्याचे दर घसरले; 2 दिवसात 5 हजार रुपयांची घट

datta jadhav

आर्थिक वर्ष 2020 मध्ये पेटीएमच्या नुकसानीत घट

Omkar B

एसबीआयची शापुरजी पालनजी सोबत भागीदारी

Patil_p

पुढील वर्षी 20 लाख वायफाय हॉटस्पॉटस्

Omkar B

विमान कंपन्यांकडून 31 मे पर्यंत भाडेवाढ नाही!

Patil_p
error: Content is protected !!