तरुण भारत

सोळा हजार ‘कोरोना लस’ उपलब्ध

‘होमआयसोलेशन’ रुग्ण कमी करण्याची कार्यवाही सुरू : तूर्त पुरेसे बेड उपलब्ध

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

Advertisements

सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी 16 हजार कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गेले चार दिवस ठप्प असलेले कोरोना लसीकरण सुरु होणार आहे. दरम्यान, होम आयसोलेशनमधील रुग्ण कमी करण्याची कार्यवाही सुरू करून  शासकीय रुग्णालयामध्ये बेड वाढविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे व प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, दुसऱया टप्प्यात महसूल व पोलीस अधिकारी कर्मचारी, तिसऱया टप्प्यात ज्ये÷ नागरिक व 45 वर्षांवरील व्याधिग्रस्त लोकांना लस दिली गेली. त्यानंतर 1 एप्रिलपासून चौथ्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोरोना लसीकरणाला गर्दी होऊ लागली, तर दुसरीकडे लसीचा पुरवठा कमी होऊ लागला. त्यामुळे 9 एप्रिलला कोरोना लसीचा साठा संपून लसीकरण ठप्प झाले होते. जिल्हय़ात आतापर्यंत 66 हजार 240 लसीचे डोस उपलब्ध झाले होते. ते सर्व संपलेले आहेत.

16 हजार लस उपलब्ध

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी लस मिळण्यासाठी आरोग्य संचालकांकडे पाठपुरावा केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हय़ाला 16 हजार लसीचा साठा मिळाला आहे. पुणे येथून लस घेऊन व्हॅन रवानाही झाली होती. त्यामुळे आता पुन्हा लसीकरण सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. खलिपे यांनी दिली. कोविशिल्ड लसचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवडय़ानंतर आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस चार ते सहा आठवडय़ानंतर घ्यायचा आहे, अशीही माहिती देण्यात आली.

होमआयसोलेशनमधून रुग्ण कमी करणे सुरू

होमआयसोलेशनमध्ये दाखल असलेले रुग्ण योग्य प्रकारे काळजी घेत नाहीत. त्यांच्यामुळे कुटुंबाला आणि इतरांनाही संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आल्याने होमआयसोलेशनमधील रुग्ण कमी करण्यात येत आहेत आणि सरकारी रुग्णालयात दाखल केले जात आहेत.

रुग्ण वाढत असल्याने बेड वाढवणार

जिल्हय़ात सद्यस्थितीत पुरेसे बेड उपलब्ध आहेत. परंतु रुग्णसंख्या वाढत असल्याने अजूनही बेड वाढवावे लागणार आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयासह सर्व तालुक्मयात कोविड सेंटर सुरू केली आहेत. गरजेनुसार होमगार्डची नवी इमारत तसेच कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयाची इमारत ताब्यात घेतली जाणार आहे, अशी माहिती डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

..तर आठ दिवसांत बेडचा तुटवडा भासेल : डॉ पाटील

जिल्हय़ात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळत आहेत. जिल्हा रुग्णालयातील सर्व इमारती आणि सर्व वार्ड आता हळूहळू कोविड सेंटरमध्ये कन्व्हर्ट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्हय़ातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आदींमध्येही कोविड सेंटर उभारण्यात येऊ लागली आहेत. त्याचबरोबर जिल्हय़ात ज्या खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे, अशा रुग्णालयांमध्येही पुन्हा कोविड सेंटर कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयासह जिल्हय़ात सर्व रुग्णालयांमधे बेड उपलब्ध आहेत. मात्र अजून आठवडाभर हीच स्थिती राहिल्यास जिल्हय़ात बेडची कमतरता भासण्याची शक्मयता असल्याची भीती डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.

Related Stories

रत्नागिरी : खेडच्या पाणीटंचाईप्रश्नी आमदार योगेश कदम आक्रमक

triratna

रत्नागिरी : लोटेतील समर्थ केमिकल कंपनीत स्फोट

triratna

तिलारी क्षेत्रालगतच्या लागवडीकडे दुर्लक्ष

NIKHIL_N

रत्नागिरी (संगमेश्वर) : बहुजन विकास आघाडीचा सबारी इंजिनिअरिंग कंपनीवर धडक मोर्चा

triratna

गोव्यातील तरुणाचे बांद्यात आकस्मिक निधन

NIKHIL_N

मुख्यमंत्री ठाकरे जसे आले तसे निघून गेले!

Patil_p
error: Content is protected !!