तरुण भारत

सिक्युरिटी गार्ड झाला आयआयएम प्राध्यापक

झोपडीवजा घरात होते वास्तव्य

कष्ट कधीच वाया जात नाहीत. जर प्रयत्नांमुळे थकल्यास एकदा 28 वर्षीय रंजीत रामचंद्रन याची कहाणी जाणून घ्या. रंजीत सिक्योरिटी गार्ड म्हणून काम करायचा आणि एका झोपडीवजा घरात राहायचा. पण त्याचे स्वप्न काही वेगळैच होते. स्वप्नपूर्ती करून तो इतरांसाठी अनुकरणीय ठरला आहे. केरळचा रंजीत आता एक प्राध्यापक असून ते देखील रांची आयआयएममध्ये. रंजीतने अलिकडेच फेसबुकवर स्वतःच्या घराच्या (झोपडीवजा) एक छायाचित्रासह स्वतःची संघर्षकथा प्रसारित केली आहे. त्याच्या या पोस्टवर 39 हजार कॉमेंट्स आणि 11 हजार शेअर मिळाले आहेत.

Advertisements

मी याच घरात जन्मलो, लहानाचा मोठा झालो, अनेक आनंदाचे क्षण घालविले. या घरापासून आयआयएम-रांचीपर्यंतचा प्रवास मी मांडत आहे. माझ्या यशाची कहाणी कुणाच्या तरी स्वप्नांसाठी पेरक ठरावी असे रंजीतने फेसबुकवर नमूद पेल आहे.

रामचंद्रन जेव्हा बीए इकॉनॉमिक्सच्या शिक्षणासाठी महाविद्यालयात जाऊ लागला तेव्हा त्याला कुटुंब आपल्या शिक्षणाचा खर्च पेलू शकत नसल्याची जाणीव झाली. यामुळे त्याने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला, पण त्याच काळात त्याला नाइट वॉचमनच्या नोकरीची एक जाहिरात दिसून आली आणि त्याने त्याकरता अर्ज केला. नशीबाने त्याला पानाथूरमध्ये बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंजमध्ये नाइट वॉचमनच कामही मिळाले.

रात्री काम, दिवसा अभ्यास

दिवसा महाविद्यालयात जायचो आणि रात्रीच्यावेळी टेलिफोन एक्स्चेंजमध्ये काम करत होतो. ही नोकरी 5 वर्षांपर्यंत केली. पदव्युत्तर शिक्षणानंतर पीएचडीसाठी आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश घेतला. पण मला केवळ मल्याळम भाषाच अवगत होती. यामुळे अनेक अडचणी आल्याने पीएचडी सोडण्याचा निर्णय घेतला, परंतु गाइड सुभाष यांनी असे करण्यापासून रोखल्याचे रंजीत सांगतो.

कुटुंबासाठी घर उभारणा

4 वर्षे 3 महिन्यांमध्ये स्वतःची पीएचडी पूर्ण केली आणि मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आयआयएम रांचीमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज केला होता. तेथील नियुक्तीचे पत्र आता मिळाले आहे. सर्वप्रथम मी कर्ज घेऊन स्वतःचे कुटुंब तसेच भावाबहिणींसाठी घर उभारू इच्छितो असे रंजीतने म्हटले आहे.

Related Stories

26 रोजी भारत बंदची हाक

Patil_p

मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा लांबणीवर

Patil_p

ट्विटरवर मोदींना फॉलो करते व्हाईट हाउस

Patil_p

लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी युपीचे आमदार अमन मणि त्रिपाठी यांच्या सह 7 जणांना अटक

pradnya p

विकास दुबेच्या साथीदाराला चकमकीत कंठस्नान

Patil_p

लॉकडाऊन यशस्वीतेची जबाबदारी पालकमंत्र्यांवर

Patil_p
error: Content is protected !!