तरुण भारत

कोरोना काळात आता श्रद्धेचा बूस्टर डोस

चारधाम यात्रेचा उत्साह शिगेला

शासकीय अतिथीगृहांमध्येच 3 कोटींची आगाऊ नोंदणी

Advertisements

केदारनाथ हेलिकॉप्टर सेवेसाठी 5 दिवसांत 8762 तिकीटे

उत्तराखंडमध्ये पुढील महिन्यापासून सुरू होणाऱया चारधाम यात्रेसंबंधी उत्साह आतापासूनच दिसू लागला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द झाली होती. यंदा कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लागू असूनही आगाऊ नोंदणीचे प्रमाण प्रचंड राहिले आहे. चारधामांचे दर्शन 17 मेपासून सुरू होणार आहे. गढवाल विकास महामंडळाला सध्या 3 कोटी रुपयांपर्यंतचे ऍडव्हान्स बुकिंग प्राप्त झाले आहे. तर 5 दिवसांत केदारनाथ हेलिकॉप्टर सेवेसाठी 8762 तिकिटांची ऑनलाईन नेंदणी झाली आहे.

ऍडव्हान्स बुकिंग पाहता यंदाचे वर्ष पर्यटनासाठी चांगले राहण्याची अपेक्षा आहे. दरवर्षी उत्तराखंडमध्ये सुमारे 4 कोटी पर्यटक दाखल होतात, यातील 60 लाख भाविक असतात. चारधाम यात्रा पाहता सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण केली जात आहे. प्रत्येक ठिकाणावर तेथील क्षमतेनुसारच लोकांच्या वास्तव्याची व्यवस्था केली जात आहे.

कोविड चाचणीनंतरच प्रवेश

चारधाम यात्रेत बाहेरील राज्यांमधून येणाऱया भाविकांना कोविड निगेटिव्ह चाचणी अहवाल किंवा लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. मागील वर्षीही मर्यादित संख्या आणि कोविड निगेटिव्ह अहवालाच्या आधारावरच चारधाम यात्रेत सामील होण्याची अनुमती देण्यात आली होती.

कधी सुरू होणार दर्शन

गंगोत्री                        14 मे

यमुनोत्री                      14 मे

केदारनाथ        17 मे

बद्रीनाथ                      18 मे

Related Stories

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्राला संबोधित करणार

datta jadhav

भारतीय तांदळाला चीनचे आव्हान

Patil_p

कमर्शियल सिलिंडर 32 रुपयांनी महाग

Patil_p

हिमाचल प्रदेश : 1700 स्थलांतरित पक्षांचा मृत्यू

pradnya p

ईशान्येत प्रियंका, दक्षिणेत राहुल गांधी

Patil_p

ट्रम्प अहमदाबादमध्ये दाखल, मोदींकडून गळाभेट

tarunbharat
error: Content is protected !!