तरुण भारत

मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंदा

केंद्र सरकारकडून संमती, 1 मे पासून कार्यभार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

सुशील चंद्रा हे भारताचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले जातील, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. त्यांच्या नावाला केंद्रीय गृहविभागाने संमती दिली आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा हे 30 एप्रिल 2021 या दिवशी निवृत्त होणार असून सुशील चंद्रा हे 1 मे 2021 या दिवशी कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांचा कालावधी 14 मे 2022 पर्यंत असेल, असेही केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्ये आणि पुटुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश येथे विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेचा शेवटचा मतदान टप्पा 29 एप्रिलला आहे. त्याच्या पुढच्याच दिवशी सुनिल अरोरा हे निवृत्त होत आहेत. या निवडणुकांचे परिणाम नव्या आयुक्तांच्या कार्यकाळात घोषित होतील. नव्या मुख्य आयुक्तांच्या कार्यकाळात गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होणार आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.

अल्प परिचय सुशील चंद्रा यांचा जन्म 15 मे 1957 या दिवशी झाला असून ते रूरकी विद्यापीठाचे बीटेक पदवीधर आहेत. त्यांनी कायद्याची पदवीही प्राप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळूर येथेही त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर काही काळ इंडियन इंजिनिअरिंग सेवेत काम केल्यानंतर त्यांनी इंडियन रेव्हेन्यू सेवेत 38 वर्षे काम केले. 15 फेब्रुवारी 2019 या दिवशी त्यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

Related Stories

लॉकडाऊन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्ससोबत बैठक सुरु

triratna

धोका वाढला : दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.57 लाखांचा टप्पा

pradnya p

गर्भपातासाठी 24 आठवडय़ापर्यंत मुदतवाढ

Patil_p

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 95 लाखांसमीप

datta jadhav

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली

datta jadhav

कचरामुक्त शहरांची यादी जाहीर

Patil_p
error: Content is protected !!