तरुण भारत

17 रोजी ‘आरटीजीएस’ चौदा तास राहणार बंद

टेक्निकल अपग्रेडेशन होणार- आरबीआयची माहिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

येत्या रविवारी म्हणजे 18 एप्रिल रोजी आरटीजीएस सेवा जवळपास 14 तासासाठी तात्पुरती बंद राहणार आहे. 18 एप्रिलला मध्यरात्री 12 ते दुपारी 2 या वेळेत टेक्निकल अपग्रेडेशन (तांत्रिक सुधारणा) करण्यासाठी ही सेवा तात्पुरती खंडित केली जाणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. साहजिकच ग्राहकांना ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्यात अडचणी येऊ शकतात. यावेळी ग्राहक आरटीजीएस मनी ट्रान्स्फर सेवेद्वारे पैसे पाठविण्यास किंवा कोणताही ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाहीत. रविवारी आरटीजीएस मनी ट्रान्सफर सेवा बंद ठेवण्यात येणार असली तरी ग्राहक ‘एनईएफटी’मार्फत ऑनलाईन व्यवहार करू शकतील. त्यामुळे लोकांना ऑनलाईन पैसे हस्तांतरित करण्यात किंवा डिजिटल पेमेंट करण्यात फारसा त्रास होणार नाही.

आरटीजीएस प्रणालीची गती वाढविण्यासाठी तांत्रिक अपग्रेडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अपग्रेडिंगनंतर ग्राहकांना अधिक सुलभपणे आणि वेगाने या सेवेचा वापर करण्याचा लाभ ग्राहकांना मिळेल, असे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आरबीआयने गेल्या आठवडय़ात देशातील एनबीएफसी, फिन्टेक स्टार्टअप्स आणि पेमेंट बँकांना आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे निधी हस्तांतरित करण्याची परवानगी दिली होती. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांव्यतिरिक्त अन्य वित्तीय संस्थादेखील आरटीजीएस आणि एनईएफटीमार्फत व्यवहार करण्याची सुविधा देऊ शकतील.

Related Stories

मुख्यमंत्र्यांना कोरोनाचा धोका

Rohan_P

मुक्ततेनंतर पीडीपी नेता पुन्हा अटकेत

Patil_p

भारतात यंदा सरासरीएवढा पाऊस

prashant_c

भुयारी मार्गाद्वारे घुसखोरीचा डाव उघड

Patil_p

मोदींच्या हस्ते मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन

Patil_p

पेट्रोल 25, डिझेल 21 रुपयांनी महाग

Patil_p
error: Content is protected !!