तरुण भारत

इटलीतील तीन शहरामध्ये डेव्हिस चषक स्पर्धेतील लढती

वृत्तसंस्था/ लंडन

2021 सालातील होणाऱया डेव्हिस चषक अंतिम स्पर्धेचे यजमानपद इटलीला मिळाले आहे. आता या स्पर्धेतील सामन्यांसाठी माद्रीदसह टय़ुरिन आणि इन्सब्रुक ही तीन शहरे संयुक्त यजमानपद भूषविणार असल्याची घोषणा सोमवारी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने केली आहे.

Advertisements

 सदर सांघिक स्पर्धेत पुरूष गटातील सामने सात दिवसाऐवजी 11 दिवसांमध्ये खेळविले जाणार आहेत. आयटीएफच्या प्रवक्त्याने या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल केल्याचे सांगितले. स्पेनमधील एका उद्योगसमुहाने गेल्या 25 वर्षांच्या कालावधीत  या क्रीडाप्रकारात सुमारे तीन कोटी डॉलर्सची रक्कम गुंतविली आहे. चालूवर्षी होणाऱया डेव्हिस चषक अंतिम स्पर्धेत सहा गट करण्यात आले असून इटलीतील टय़ुरिन आणि इन्सब्रुक तसेच माद्रीद या तीन शहरामध्ये प्रत्येकी दोन गटांचे सामने खेळविले जातील. त्यानंतर माद्रीद शहरामध्ये उपांत्यपूर्व फेरीचे दोन सामने त्यानंतर इन्सब्रुक आणि टय़ुरिन येथे प्रत्येकी एक उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. माद्रीदमध्ये या स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने खेळविले जातील. माद्रीदमध्ये अ गटातील स्पेन, रशिया आणि इक्वेडोर त्याचप्रमाणे ब गटातील कॅनडा, कझाकस्तान आणि स्वीडन यांचे सामने होणार आहेत. क गटात फ्रान्स, ब्रिटन आणि झेक यांचा समावेश असून यांचे सामने माद्रीदमध्ये खेळविले जातील. ड गटातील ऑस्ट्रेलिया, क्रोएशिया, हंगेरी, इ गटातील अमेरिका, इटली, कोलंबिया यांचे सामने टय़ुरिनमध्ये होणार आहेत. 2022 साली होणाऱया डेव्हिस चषक अंतिम स्पर्धेत संघांची संख्या कमी राहणार असून या स्पर्धेत 16 देशांचा समावेश राहील.

Related Stories

कबड्डीला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देण्याचे ध्येय

Patil_p

सध्याच्या घडीला आयपीएलपेक्षा आयुष्य महत्त्वाचे : रैना

Patil_p

स्टिनेझ स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनचा सहभाग

Patil_p

दीपक चहरला सरावाची परवानगी

Patil_p

मधल्या फळीत खेळण्याची अजिंक्य रहाणेची तयारी

Patil_p

अन् त्याने डोंगरमाथ्यावरुन सामना पाहिला!

Amit Kulkarni
error: Content is protected !!