तरुण भारत

दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ मायदेशी रवाना

वृत्तसंस्था/ ढाक्का

बांगलादेशमध्ये कोरोना महामारीचा प्रकोप झपाटय़ाने वाढत असल्याने येथील हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान बांगलादेशच्या दौऱयावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाला आपला दौरा आटोपता घ्यावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने हा दौरा अर्धवट सोडून मायदेशी प्रयाण केले आहे.

Advertisements

 बांगलादेशमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचे दिसून येत असल्याने शासनाने 14 एप्रिलपासून एक आठवडय़ाच्या कालावधीसाठी हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने वनडे क्रिकेट मालिकेतील चार सामने खेळले असून त्यांचा पाचवा आणि शेवटचा सामना मंगळवारी आयोजित केला होता पण लॉकडाऊन होण्याआधीच दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने ही मालिका अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. अलिकडच्या कालावधीत बांगलादेशमध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये प्रत्येक दिवशी 7000 नवे रूग्ण मिळत आहेत.

Related Stories

शरीरसौष्ठव संघटनेत प्रथमच महिला सचिव

Omkar B

इंडियाना वेल्स ओपन टेनिस स्पर्धा लांबणीवर

Patil_p

रामचंद्र मन्नोळकर चषकावर नील स्पोर्ट्सचे नाव

Omkar B

व्हेरेव्ह, बुस्टा, ब्रॅडी, ओसाका उपांत्य फेरीत

Patil_p

ऍस्टन व्हिला अंतिम फेरीत ट्रेझेग्यूचा गोल निर्णायक

Patil_p

चीनची वांग दुसऱया फेरीत

Patil_p
error: Content is protected !!