तरुण भारत

इटलीचा सोनेगो अजिंक्य

वृत्तसंस्था/ कॅगलेरी

एटीपी टूरवरील कॅगलेरी आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या सोनेगोने एकेरीचे जेतेपद मिळविताना सर्बियाच्या विद्यमान विजेत्या डिजेरीचा पराभव केला. सोनेगोला या जेतेपदासाठी अंतिम सामन्यात तीन तास झगडावे लागले.

Advertisements

 रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात इटलीच्या 25 वर्षीय सोनेगोने डिजेरीचा 2-6, 7-6 (7-5) 6-4 असा पराभव केला. या स्पर्धेत 2006 नंतर विजेतेपद मिळविणारा इटलीचा सोनेगो हा पहिला टेनिसपटू आहे. यापूर्वी म्हणजे 2006 साली इटलीच्या व्हॉलेंड्रीने विजेतेपद मिळविले होते. सोनेगोने गेल्यावर्षी प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. तसेच त्याने 2019 साली तुर्कीतील एटीपी टेनिस स्पर्धा जिंकली होती.

Related Stories

भारत की इंग्लंड? फैसला आज

Patil_p

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनची निवडणूक तूर्ताला रद्द

Patil_p

जोकोव्हिक, नादाल यांची विजयी घोडदौड

Patil_p

इंग्लंड संघाचे श्रीलंकेत पुनरागमन

Patil_p

इजिप्तमधील टेनिस स्पर्धत ऋतुजा भोसले विजेती

Patil_p

आयोजक म्हणतात, पुढील वर्षीही ऑलिम्पिक होणे कठीण!

Rohan_P
error: Content is protected !!