तरुण भारत

70 टक्के जपानी लोकांना ऑलिम्पिक नको – सर्व्हेतून निष्कर्ष

वृत्तसंस्था/ टोकियो

कोरोना व्हायरचा प्रकोप वाढत असल्याने जपानच्या 70 टक्केहून अधिक लोकांना येथे होणारी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द केली जावी किंवा ती पुन्हा एकदा लांबणीवर टाकावी, असे मत व्यक्त केले आहे. क्योडो न्यूजने आयोजित केलेल्या सर्वेक्षणात जपानच्या जनतेने वरीलप्रमाणे कौल दिला आहे.

Advertisements

येत्या जुलैमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार असून सुमारे शंभरहून अधिक दिवस राहिले असतानाच लोकांचा वरीलप्रमाणे कौल मिळाला आहे. या सर्व्हेमध्ये 39.2 टक्के लोकांना ही स्पर्धाच रद्द करावी, असे वाटते तर 32.8 टक्के लोकांना पुन्हा एकदा ही स्पर्धा लांबणीवर टाकली जावी, असे वाटते. फक्त 24.5 टक्के लोकांनाच क्रीडा जगतातील हा महामेळावा नियोजनाप्रमाणे पूर्ण व्हावा, असे वाटते. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी टोकियोने सोमवारीच तातडीची उपाययोजना सुरू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने 92.6 टक्के लोकांनी तीव्र चिंता व्यक्त केली असल्याचे क्योडोने 10 ते 12 एप्रिल या अवधीत केलेल्या सर्व्हेमध्ये आढळून आले आहे. जपानमध्ये 45 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरणाची सुरुवात करण्यात आली असून विदेशातून येणाऱया लसीचा तुटवडा त्यांना भासत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेगही थोडासा मंदावला असल्याने व्हायरसची लाट रोखली जाण्याची शक्यता कमी वाटते. लसीकरणाच्या प्रगतीवरही जपानच्या 60 टक्के लोकांनी असमाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

लंका दौऱयासाठी शिखर धवनकडे नेतृत्व?

Patil_p

अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाण निवृत्त

Patil_p

अमेरिकेची केनिन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

भारताचा अर्जेंटिनावर मोठा विजय

Amit Kulkarni

डेन्मार्कचे मॉल्डोव्हावर 8 गोल

Patil_p

कोरोनामुळे चीनमधील सर्व टेनिस स्पर्धा रद्द

Patil_p
error: Content is protected !!