तरुण भारत

कोरोनाला नमवणारा पडिक्कल नव्या इनिंग्जसाठी सज्ज

आरसीबी सहकाऱयांसमवेत सरावाला प्रारंभ, प्रथमश्रेणी क्रिकेटमधील धडाकेबाज फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न

चेन्नई / वृत्तसंस्था

Advertisements

कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटावर मात केल्यानंतर आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल आता आयपीएलचे व्यासपीठ गाजवण्यासाठी पूर्ण सज्ज झाला आहे. सोमवारी त्याने आरसीबी संघसहकाऱयांसमवेत सरावाला सुरुवात केली. यापूर्वी, दि. 22 मार्च रोजी कोरोनाची बाधा झाल्यानंतर तो आयसोलेशनमध्ये होता. पडिक्कलने यापूर्वी प्रथमश्रेणी हंगाम गाजवला असून तोच कित्ता आयपीएल स्पर्धेतही गिरवण्याचा त्याचा मानस आहे.

‘कोव्हिड माझ्यासाठी मोठा सेटबॅक होता. पण, काही बाबी आपल्या हातात नसतात. त्यामुळे, परिस्थिती स्वीकारुन समोर जाणे भाग होते. आता मी पूर्ण सुसज्ज झालो असून पुढील लढतीसाठी उपलब्ध आहे’, असे त्याने आरसीबीच्या ट्वीटर हँडलवरुन पोस्ट केलेल्या व्हीडिओत नमूद केले.

‘मागील आयपीएल स्पर्धा माझ्यासाठी धमाकेदार ठरली. मी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अलीकडे सय्यद मुश्ताक अली व विजय हजारे चषक स्पर्धेत फॉर्म कायम राखण्यात मला यश आले. आता यंदाच्या आयपीएल मोसमाबाबत मी महत्त्वाकांक्षी आहे’, असे पडिक्कल पुढे म्हणाला.

20 वर्षीय डावखुरा देवदत्त पडिक्कल यापूर्वी मागील आयपीएल हंगामात आरसीबीतर्फे सर्वोच्च धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत अव्वल राहिला होता. त्याने त्या हंगामातील 15 सामन्यात 5 अर्धशतकांसह 473 धावांची आतषबाजी केली. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली स्पर्धा व विजय हजारे चषक स्पर्धाही त्याने गाजवल्या. त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 6 सामन्यात 43.60 च्या सरासरीने 218 धावा तर विजय हजारे चषक स्पर्धेत 7 सामन्यात 737 धावांचे योगदान दिले.

यंदा आयपीएल हंगामातील मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात देवदत्त क्वारन्टाईन असल्याने खेळू शकला नाही. आता पुढील लढतीसाठी तो उपलब्ध असणार आहे. आरसीबीचा पुढील सामना केकेआरविरुद्ध दि. 18 रोजी खेळवला जाईल. त्यावेळी विराट-पडिक्कल सलामीला उतरु शकतील. यापूर्वी मुंबईविरुद्ध सलामीच्या लढतीत विराट-शार्दुल ही जोडी सलामीला उतरली आणि त्यांनी 4.2 षटकात 36 धावांची सलामी दिली. त्या लढतीत शार्दुलचा वाटा 10 धावांचा तर विराटचा वाटा 33 धावांचा राहिला होता.

Related Stories

आयर्लंड वनडे संघाचे नेतृत्व बलबिर्नीकडे

Patil_p

मोहम्मद रकिप मुंबई सिटीशी करारबद्ध

Patil_p

अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराटला रजा

datta jadhav

कर्नाटकातील मुली भारतीय महिला क्रिकेट संघात

Shankar_P

बार्सिलोनाची लढत पीएसजी बरोबर

Patil_p

विराट कोहलीची घसरण, जो रुटची झेप

Patil_p
error: Content is protected !!