तरुण भारत

चक्क रिक्षातच लावला महिलेला ऑक्सिजन

वडुज ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर बंद असल्याने ओढावली परिस्थिती,

प्रतिनिधी/ वडूज  

Advertisements

 येथील ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटर बंद असल्याने सोमवारी कोरोना बाधित एका महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेरच रिक्षामध्ये ऑक्सीजन लावावा लागला. या रुग्णाला सातारला नेहण्यासाठी तब्बल चार तास रुग्णवाहिकाही मिळाली नसल्यामुळे नातेवाईकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, येथील 75 वर्षीय एक वृद्ध महिला सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास कोरोना तपासणीसाठी आली होती. तपासणीनंतर संबंधित महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी महिलेची ऑक्सीजन लेवलची तपासणी केली असता   ती कमी होती. त्यातच ग्रामीण रूग्णालयातील कोव्हिड सेंटर बंद होते. आजपासून ते कार्यान्वित करण्यात येणार होते, मात्र त्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदी स्टाफ उपलब्ध न झाल्याने ते सेंटर सुरू होऊ शकले नाही. शिवाय 

ग्रामीण रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग सुरू असल्याने त्याठिकाणी रूग्ण होते. त्यामुळे संबंधित महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेरच एका रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्यात आला होता. त्यानंतर महिला रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णवाहिकेसाठी  संपर्क साधला. मात्र तीन ते चार तास रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी कोरेगाव येथील खासगी रूग्णवाहिकेशी संपर्क साधून त्या रूग्णवाहिकेने रूग्णाला साताऱयाला नेले. या घटनेची चर्चा शहरात सुरू होती. शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत  आहे. ग्रामीण रूग्णालयातील कोव्हीड सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Stories

जिव्हाळय़ाचा लक्षवेधी ’बकरा’

Patil_p

कोल्हापूर : सीपीआरच्या अधिष्ठातापदी डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची नियुक्ती

Shankar_P

सोलापूर शहरात नवे 54 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, दोन रुग्णांचा मृत्यू

Shankar_P

सातारा : माजी आमदारासह 18 जणांवर गुन्हा

datta jadhav

सातारा : विरोधकांचे आरोप बिनबुडाचे : सरपंच डोईफोडे

triratna

‘कराड जनता’ ठेव परताव्यासाठी ठेवीदारांची केवायसी घेणार

datta jadhav
error: Content is protected !!