तरुण भारत

जिह्यात कोराना मृतांची संख्या 400 पार

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिह्यात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी ठरत आह़े आतापर्यंत तब्बल 400 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े मागील काही दिवसांत कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आह़े

Advertisements

 मृतांमध्ये खेडमधील 84 वर्षीय पुरूष, रत्नागिरीमधील 54 वर्षीय पुरूष, दापोलीमधील 65 वर्षीय पुरूष, मंडणगडमधील 82 वर्षीय महिला व चिपळूण मधील 72 वर्षीय महिलेचा समावेश आह़े तर जिल्हा शासकीय रूग्णालायकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील 24 तासांमध्ये तब्बल 1 हजार 240 कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 193 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये केवळ 34 से एकूण 227 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 35 दापोली 22, खेड 22, गुहागर 34, चिपळूण 92, संगमेश्वर 14, लांजा 8 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता 12 हजार 960 इतकी झाली आह़े

 तर मागील 24 तासात 72 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्यात आता 11 हजार 122 पर्यंत पोहचली आह़े बरे होण्याचे प्रमाण 85.81 इतके आह़े कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची तालुकानिहाय आकडेवारी नुसार रत्नागिरी 101, खेड 61 गुहागर 14, दापोली 43, चिपळूण 97, संगमेश्वर 46, लांजा 14, राजापूर 21, मंडणगड 6 जणांचा मृत्यू झाला आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या 403 इतकी पोहचली आहे. मृत्यूदर 3.11 इतका आह़े

एकूण रूग्ण -12960

नवे रूग्ण -227

मृत्यू – 5 एकूण मृत्यू 403

Related Stories

‘क्वारंटाईन’प्रश्नी प्रशासनाची बेपर्वाई

NIKHIL_N

मच्छीमारांच्या समस्या मार्गी लावणार

NIKHIL_N

कृपा..नवल गुरु रायाची..!

NIKHIL_N

युवासेनेची बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक

Patil_p

कदमवाडी येथे विहीरीत बिबट्याची दोन पिल्ले आढळली

Shankar_P

कोकण किनारपट्टीवर नवा ‘चतुर’

NIKHIL_N
error: Content is protected !!