तरुण भारत

जिल्हय़ात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

पोसरेत वादळी पावसामुळे दोन घरांसह गोठय़ांचे नुकसान

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

जिल्हय़ात रविवारी व सोमवारी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली, खेड तालुक्यातील पोसरे येथे वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने झाडे माडांचे नुकसान झाले तसेच घर, गोठय़ाचेही नुकसान झाले. चिपळूणच्या पूर्व भागातही पावसाने हजेरी लावली होती, राजापूर तालुक्यातही रात्रीच्या वेळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मात्र अवेळी पडलेल्या या पावसामुळे आंबा बागायतदार मात्र धास्तावला आहे.

खेड प्रतिनिधीने कळवल्यानुसार तालुक्यातील पोसरे येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱयासह पडलेल्या पावसामुळे झाडे कोसळून दोन घरांसह गोठय़ांचे नुकसान झाले. याशिवाय लग्नाचा मंडपही वादळात उद्ध्वस्त झाल्याने हानी झाली आहे. 15 ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

काही गावांना वादळी पावसाचा तडाखा

तालुक्यातील पंधरागाव विभागातील धामणंद भागातील पोसरे खुर्द, पोसरे बदुक, साखर आदी गावांना वादळी पावसाचा तडाखा बसला. पोसरे येथील शाहीद खेरटकर यांच्या घरावर झाड कोसळून हानी झाली. सलमान खेरटकर यांच्या विवाह सोहळय़ासाठी उभारलेला लग्नमंडप वादळी पावसामुळे उद्ध्वस्त होवून मोठी हानी झाली आहे. परिसरातील अनेक घरांसह गोठय़ांवर झाडे कोसळली. घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. याबाबत पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. विद्युतखांब कोसळून खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

सोमवारी पुन्हा पावसाची हजेरी

 सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास रणरणत्या उन्हात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. अर्धा तास पडलेल्या पावसात उकाडय़ाने त्रस्त नागरिकांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. अचानक पडलेल्या पावसामुळे साऱयांची तारांबळ उडाली. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना वाहने हाकताना कसरतच करावी लागली. एकीकडे कोरोनाच्या संकट असतानाच अवकाळी पावसाने आंबा बागायतीचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. 

चिपळूण तालुक्यात तुरळक पाऊस

चिपळूण प्रतिनिधीने कळवल्यानुसार तालुक्यात रविवारी सायंकाळी 4 च्या सुमारास अचानक बदल होऊन तालुक्यातील शिरगाव, पोफळीसह दसपटी भागात वादळी वाऱयासह तुरळक पाऊस कोसळला. रविवारप्रमाणेच सोमवारीदेखील दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱयासह पाऊस झाला. मात्र त्यानंतर पुन्हा वातावरणात उष्मा सुरु झाल्याचे चित्र होते.

राजापुरात रात्री पडलेल्या पावसामुळै लाकडे वैरन भिजली

राजापूर प्रतिनिधीने कळवल्यानुसार तालुक्यात प्रचंड उकाडय़ामुळे तालुकावासीय त्रासलेले असताना रविवारी रात्री 10 च्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि पावसाला सुरूवात झाली. अर्धा ते पाऊणतास जोरदार पाऊस कोसळला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळाला. रात्री अचानक पाऊस कोसळल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. घराबाहेर ठेवलेली लाकडे, वैरण भिजल्याने नुकसान झाले आहे.

  वीजाच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता

भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिह्यात 12 एप्रिल ते 14 एप्रिल 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

लांजा तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस सोमवारी दिवसभर गर्मीने हैराण झाले असतानाच सायंकाळी 6 च्या दरम्यान अचानक लांजा तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाळी पूर्व भाजावळींची कामे सुरू असतानाच पावसामुळे भाजावळीच्या कामात व्यत्यय आला आहे. सालपे, कोचरी, पालु, माचाळ, गोविळ, बोरीवले, चिंचुरटी परिवारात जोरदार पाऊस पडला

Related Stories

मार्गताम्हानेत मध्यरात्री आग लागून कार, दुचाकी खाक

Patil_p

कोरोनामुळे उद्याच्या दहिकाल्याचा माहोलही शमला

Patil_p

राजीवडा येथील रूग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह

triratna

प्रसंगी गावाने निधी काढून चाकरमान्यांची सोय करावी!

NIKHIL_N

चक्रीवादळात ‘रामराजे’चे 50 लाखांचे नुकसान

Patil_p

परप्रांतियांना कोकण किनारपट्टी आंदण देण्याचा घाट!

NIKHIL_N
error: Content is protected !!